Posts

Showing posts from June, 2020

नांदेडला चार पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळले!

Image
नांदेडला चार नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले! प्रतिनिधि :- बल्खी आसद आनंदनगर, भावसार चौक, कंधार या नवीन भागांचा समावेश नांदेड दि.01 जुलै: आज सकाळी प्राप्त 15 अहवाला पैकी 5 अहवाल निगेटिव्ह तर 4 अहवाल आढळले आहेत. 6 अहवाल हे अनिर्णित आले आहेत. आज नवीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या ही 391 झाली आहे. बाधित रुग्ण तपशील: नांदेड शहर •आनंदनगर (देना बँक जवळ) 1 महिला वय 36 •भावसार चौक(अनिकेत नगर) 1 महिला वय 65 •इतवारा (गाडीपुरा) 1 महिला वय 54 ग्रामीण भागात  •उमरज, ता. कंधार: 1 महिला वय 65 आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार ही महिला रुग्णांचा समावेश आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर

Image
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर प्रतिनिधि :- बल्खी आसद नांदेड  : अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम चुकीच्या बँक खात्यामुळे किंवा खाते बंद पडल्यामुळे खात्यावर जमा झाली नाही अशा विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्याकांशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. आर.कुंडगीर यांनी केले. अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी 15 कलमी कार्यक्रम   घोषित केलेला आहे. या अंतर्गत सन 2019-20 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन भरले आहेत. नवीन 18 हजार 349 व नुतनीकरण 36 हजार 435 असे एकूण 54 हजार 784 इतके विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या एकूण 54 हजार 784 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची एकुण रक्कम 6 करोड 12 लाख रुपये पुणे कार्यालयातून जमा करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली किंवा नाही...

बेटमोगरा येथील एका महिलाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Image
बेटमोगरा येथील एका महिलाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह संपर्कातील अकरा जनांना मुखेड येथील कोव्हीड सेंटरला दाखल बेकमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी तालुक्यातील बेटमोगरा येथील एका ५५ वर्षीय महिलेच्या काल कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  आला.या रुग्णाचे स्वॅब दि.२९ जुन रोजी घेण्यात आले होते. तर त्या रुग्णाचे अहवाल दि.३० रोजी सकाळी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. सदरील हा रुग्न नांदेड येथील बाधीत शहरामध्ये  प्रवास केल्याचे समजते.या रुग्णाला सर्दी,खोकला,श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्या  रुग्नाला दि.२९ जुन रोजी नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्या रुग्णाचे दि.३० जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकून आकरा जनांना त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी मुखेड येथील कोव्हीड सेंटर येथे भरती करण्यात आले.  कोरोनाचा शिरकाव बेटमोगरा सारख्या ग्रामिण भागात झाल्याने त्या ठिकाणाला ग्राम पंचायतचा व आरोग्य प्रशासनाचा वतीने सिल करण्यात आले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावात...

नांदेडला 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; बाधित संख्या 387

Image
नांदेडला 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; बाधित संख्या 387 नांदेड दि 30 जून: आज सायंकाळी उशिरा प्राप्त 25 हवाला पैकी 12 अहवाल पॉझिटिव्ह तर 9 अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत. 3 अहवाल अनिर्णित तर 1 अहवाल नाकारण्यात आलेला आहे. सायंकाळी 1 अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता असे एकूण दिवसभरात 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या 387 झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील नांदेड शहर बाफना- दोन महिला वय 28 व 64 आंबेडकर नग-र 1 महिला (बालिका) वय 5 आंबेडकर नगर- 1 पुरुष वय 35 असर्जन- 3 महिला वय 37, 10 व 11  असर्जन- 1 पुरुष वय 42 विनायकनगर- 1 महिला वय 34 वसंतनगर- 1 पुरुष वय 52 ग्रामीण भागात मुक्रमाबाद ता. मुखेड- 1 पुरुष वय 20 मुक्रमाबाद ता. मुखेड- 2 महिला वय 38 व 58

अतिवृष्टी नुकसानीचे थकीत अनुदान बोगस बियाने विक्रेत्यास चौकशी व लॉकडाऊन काळातील विज बिल तात्काळ माफ करा:- राहुल गांधी विचार मंच बिलोली

Image
प्रतिनिधि :- बल्खी आसद बिलोली :- यंदा मौसमी पावसाला सगळीकडे दमदार सुरुवात झाली. पाऊस चांगला झाल्याने शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात खरिपाची पेरणी केली. मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी करून लागवड केली. अशा अनेक शेतकर्‍यांचे बियाण उगवले नाही. अशा शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभा टाकले  बोगस बियाणे बाजारात आणून विक्री करणारे व्यापारी व संबंधित कंपनीवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह राहुल गांधी विचार मंच बिलोली यांच्या कडुन होत आहे. विज वितरण कंपनी ने गेल्या दोन तिन दिवसापासुन शहराह तालुक्यातील मार्च महिन्या पासुन बंद आसलेल्या विज बिल देण्यास व वसुलीस सुरुवात केली खरी पण मार्च महिन्या पासूनची आजची जी मिटर रिडींग ग्राह्य धरत सरासरी ने मिटर रिडींग टाकून शहरासह तालुक्यातील असंख्य ग्राहकांना वाजविपेक्षा जास्त बिले दिली . व्यावसायिक ग्राहकांना तर आपले पूर्ण व्यवसाय बंद करून घरी बसले होते.त्यांना नियमित रिडींग नुप्सार विज बिल महिन्याला सरासरी ६०० रुपये येत होते . याप्रमाणे पाहिले तर मार्च एप्रिल मे या तिन महिन्याचे बिल १८०० रुपये यायला पाहिजे होते.परं...

केंद्र शासनाने डिझेल व पेट्रोलची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी:- नांदेड शहर ,जिल्हा काँग्रेस कमिटी

Image
  केंद्र शासनाने डिझेल व पेट्रोलची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना घातले काँग्रेसने साकडे नांदेड:-  कोरोनाच्या महामारीने देशात हाहःकार माजविला असताना सामान्य माणसांना आधार देण्याऐवजी केंद्र सरकारने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी या संबंधिचे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन राष्ट्रपतींना या संदर्भात साकडे घातले आहे. नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना एक निवेदन दिले. हे निवेदन देशाचे राष्ट्रपती यांना संबोधित करुन तयार करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्र्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात यावे अशी विनंती काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना यावेळी केली. त्यानंतर याच आशयाचे निवेदन 5 जणांचा समावेश असलेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिका...

लो चोरो बाँधो भारा अदा तुम्हारा आधा हमारा व्यापारी मालामाल , शेतकऱ्यांचे बेहाल ! दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी कर्जाच्या कचाट्यात

Image
आजी - माजी आमदारांचे दुर्लक् आजी - माजी आमदारांचे दुर्लक्ष मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद बनावट कंपन्याच्या नावाखाली निकृष्ट बियाण्यांची पॅकींग करून नफा कमावलेले व्यापारी मालामाल झाले आहेत तर दुबार पेरणीचे संकट समोर उभे ठाकल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या कचाट्यात सापडल्याची स्थिती तालुक्यात निर्माण झाली असून बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांतून केली जात आहे . कृषी सेवा केंद्रांनी चक्क चाळणी केलेले सोयाबीन विविध बँडच्या नावाखाली बनावट सील व बॅच लाऊन पॅकिंग केल्याची चर्चा आहे . सातशे रुपयांचे सोयाबीन कंपनीच्या नावाखाली बावीसशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत विक्री केली . यामुळे जे घडायचे तेच घडले , मृगाच्या पावसात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसून कोणतीही प्रक्रिया नसणारे बियाणे जळून गेल्याने उगवणच झाली नाही . असा प्रकार तालुक्यात सर्वच ठिकाणी झाला असून जास्तीचा नफा कमविण्याच्या हेतूने व्यापाऱ्यांनी केलेली करामत शेतकऱ्यांच्या मरणावर येऊन ठेपली आहे . बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यास त्यांना त्रोटक उत्तरे देऊन पिटाळण्यात आले . यानं...

अखेर... 'या' मोठ्या सोयाबीन कंपनी वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Image
 अखेर... 'या' मोठ्या सोयाबीन कंपनी वर फसवणुकीचा गुन्हा दाखल नांदेड:- इंदौर येथील एका सोयाबीन कंपनीवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नांदेड दि.२९ जून: बोगस सोयाबीन विक्री केल्यामुळे शेकडो हेक्टरवर उगवून होऊ न शकल्याने करोडो रुपयांचे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले. या प्रकरणी इंदौर येथील एका सोयाबीन कंपनीवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यंदा मौसमी पावसाला सगळीकडे दमदार सुरुवात झाली. पाऊस चांगला झाल्याने शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात खरिपाची पेरणी केली. मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी करून लागवड केली. अशा अनेक शेतकर्‍यांचे बियाण उगवले नाही. अशा शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभा टाकले. बोगस बियाणे बाजारात आणून विक्री करणारे व्यापारी व संबंधित कंपनीवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांकडून होऊ लागली होती. यातून प्रशासनावर मोठा दबाव वाढत गेला. मागच्या आठवडयात जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. या प्रकरणाची दखल घेत कृषी...

वसंतनगर येथील मुख्य लिपिक खा.खा. शेख सेवानिवृत्त

Image
वसंतनगर येथील मुख्य लिपिक खा.खा. शेख सेवानिवृत्त मुखेड: सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंतनगर येथील मुख्य लिपिक खा.खा. शेख टेंबुर्णीकर हे दि. 30 जून रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.       खा.खा. शेख यांचा जन्म 10 जून 1962 रोजी खाजामिया शेख यांच्या पोटी टेंभुर्णी तालुका नायगाव येथे गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण टेंभुर्णी येथे जि. प. प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक शिक्षण जनता हायस्कूल कौठा येथे झाले. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर कंधार येथील शिवाजी महाविद्यालयात पद्व्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. खा.खा. शेख यांनी विमुक्त जाती सेवा समिती वसंत नगर या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मरवाळी येथे 1984 रोजी कनिष्ठ लिपिक या पदापासून कार्यास प्रारंभ केला. त्यानंतर 1992 ला वरिष्ठ लिपिक म्हणून माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी येथे पदोन्नती मिळाली. त्यांचे उत्कृष्ठ कार्य पाहून 1996 रोजी सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंत नगर येथे मुख्य लिपिक म्हणून संस्थेंचे तत्क...

कोरोना लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करा - प्रा.आडेपवार

Image
मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद विज वितरण कंपनी ने गेल्या दोन तिन दिवसापासुन शहराह तालुक्यातील मार्च महिन्या पासुन बंद आसलेल्या विज बिल देण्यास व वसुलीस सुरुवात केली खरी पण मार्च महिन्या पासूनची आजची जी मिटर रिडींग ग्राह्य धरत सरासरी ने मिटर रिडींग टाकून शहरासह तालुक्यातील असंख्य ग्राहकांना वाजविपेक्षा जास्त बिले दिली . व्यावसायिक ग्राहकांना तर आपले पूर्ण व्यवसाय बंद करून घरी बसले होते.त्यांना नियमित रिडींग नुप्सार विज बिल महिन्याला सरासरी ६०० रुपये येत होते . याप्रमाणे पाहिले तर मार्च एप्रिल मे या तिन महिन्याचे बिल १८०० रुपये यायला पाहिजे होते.परंतु आज तेच बिल ४५०० रु . ते ५००० रू.चिल आकारले आहे कारण गेली ३ महिने रिडींग न घेतल्याने दर महिन्याला रिडींग वाढत गेली त्यानुसार रिडींग ची किंमत वाढत । गेली . विज वितरण कंपनीने ३ महिणे म रिडींग घेतली नाही परिणामी कंपनीने न ग्राहकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.मुखेड तालुक्यातील ७० % ते ८०१८ ग्राहकांनी परी आँनलाईन बिले भरून सुद्धा चौपट बिले आले आहेत . सर्व सामान्य लोकांनची काहीही चुक नसताना केवळ विज वितरण कंपनीच्या | चुकीच्या धोरणामुळे आर्थिक ...

श्रेया संजय वाघमारे हिचे राज्यस्तरीय ज्युनीयर आय . ए . एस . परिक्षेत यश

Image
श्रेया संजय वाघमारे हिचे राज्यस्तरीय ज्युनीयर आय . ए . एस . परिक्षेत यश मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद मुखेड - शहरातील एका इंग्लीश स्कुल मध्ये शिकत असलेली कु.श्रेया संजय वाघमारे हिने राज्यस्तरीय ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षेत उत्तेजनार्थ यश संपादन केले आहे . ज्युनीयर आय.ए.एस. | परिक्षा ही संपुर्ण महाराष्ट्रात होत असते यात मुखेड शहरातील व्यापारी तथा विश्व हिंदु परिषदचे | शहरमंत्री असलेले संजय वाघमारे यांची मुलगी | कु . श्रेया वाघमारे हीने भाग घेतला असता | उत्तेजनार्थ यश संपादन केल्यामुळे तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . तीच्या यायशाबद्दल आजोबा अशोक वाघमारे , वडील संजय वाघमारे , नगरसेवक प्रा . विनोद आडेपवार ,संपादक जयभीम सोनकांबळे, किसान सेनेचे शंकर पाटील लुट्टे ,पत्रकार रियाज शेख, पत्रकार ज्ञानेश्वर डोईजड , पत्रकार महेताब शेख,संदिप पोफळे , प्रमोद मदारीवाले , योगेश पाळेकर,इमरान अत्तार यांच्यासह अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला .

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मुखेडच्या नऊ विध्यार्थ्यांची निवड...

Image
 नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मुखेडच्या नऊ विध्यार्थ्यांची निवड... मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद ★ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व... जानेवारी २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मुखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . शंकरनगर येथील नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे . विशेष म्हणजे निवड झालेले सर्व नऊ ही विद्यार्थी ग्रामीण भागातील असुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.नांदेड जिल्हयातील ८० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात येते . यावर्षी तालुक्यातील एकूण १५२० विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी १४३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असुन त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे . प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांत कु.अनुष्का विठ्ठल धनगे जि.प.प्रा.शा.मंडलापूर , संचिता गजानन गाडले किसान विद्यालय , उमरदरी , ममता रमाकांत पाटील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल बाहाळी , विश्वदीप बाबुराव वाघमारे जि.प.प्रा.शा.जांभळी , पद्माकर अंकुश धोतरे कें.प्रा.शा...

शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या : मन्मथ खंकरे

Image
शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या : मन्मथ खंकरे मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद मुखेड तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी मागील दिवसात सोयाबीन तूर , मूग , उडीद , कापूस या पिकांची हजारो हेक्टर वर पेरणी केली असता अनेकांच्या शेतात बोगस बियाणेमुळे सोयाबीन उगवलाच नाही . संदर्भात शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारा खर्च द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे . गेल्या चार वर्षापासुन निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळेवर पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते सतत चार वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच तालुक्यात दमदार पाऊस झाला चार ते पाच मोठे पाऊस झाले तालुक्यातील सातही मंडळात १०० मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर पावसाची तालुक्याची सरासरी १३३ मीमी च्या वर आहे तर तालुक्यातील बाहाळी व मुक्रमाबाद मंडळात जवळपास १५० ते २०० मी मी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पेरण्या उरकल्या तालुक्यात ८० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या मात्र पेरणीच्या आठ दिवसानंतर...

योगासन चॅम्पीयनशीप -2020 या स्पर्धेत श्रीशा मारकोळे भारतात दुसरी

Image
योगासन चॅम्पीयनशीप -2020 या स्पर्धेत श्रीशा मारकोळे भारतात दुसरी  मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद नांदेड :- नुकतेच अमेठी युनिवरसीटी तथा आयुष मंत्रालय , व इंडियन फार्मसी असोसिएशन आणि इंटरनॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ ग्लोबल योगासन चॅम्पियनशिप - 2020 ' च्या ऑल इंडिया लेवल योगा स्पर्धेत कु . श्रीशा अविनाश मारकोळे हिने 13 ते 25 या वयोगटातून पहिल्या फेरीत घवघवीत यश संपादन केले . कोरोनाच्याजागतीक संकटामुळे नुकतेच 20 जून रोजी अंतीम ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली . त्यात श्रीशा ने उत्कृष्ठ आसनांचे प्रदर्शन केले . या स्पर्धेचे ऑनलाईन निकाल जागतिक योगदिनाच्या दिवशी जाहिर करण्यात आले . त्यामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या श्रीशा मारकोळे हिने 13 ते 25 वर्ष वयोगटातून भारतातून व्दितीय क्रमांक पटकावला . या स्पर्धेसाठी तिला इंटर नॅशनल योगापटू श्रेयश मार्कण्डेय , नांदेड येथील योगेश कोरडेवार , तसेच रामन बैनवाड , प्रकाश इबितदार यांनी मार्गदर्शन केले . यापूर्वी सुध्दा श्रीशाने जिल्हा स्तरीय , विभागीय व स्टेटलेवल योगासन स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक मिळवली आहेत . कुं . श्र...

तुम्ही मोबाईल चार्जिंग करताना या पाच चूका करू नका….

Image
मित्रांनो तुमचे स्वागत आहे मी आसद इब्राहिम बल्खी Computer hardware&Mobile Soft technician, आपण पाच ते सहा महिन्यांपूर्वी एक नवा कोरा मोबाईल विकत घेतला, आणि आज आपण त्या मोबाईलच्या बॅटरीची अवस्था अशी आहे की, मी मोबाईल चार्जिंग करायला लागलो तर चार ते पाच तास चार्जिंग करण्यास लागतात, आणि बॅटरी फुल चार्ज झाली की अर्धा ते पाऊण तासात ही बॅटरी पूर्णपणे उतरते. असे नेमके का होते हे ज्यावेळी मी कस्टमर केअर कडे गेलो आणि त्यांना विचारले त्यावेळी त्यांनी हात वर केले, म्हंटले बॅटरीला कोणतीही वॉरंटी गॅरंटी येत नाही, सहा महिन्यांची वॉरंटी असते तुम्हाला सहा महिने आणि वरती काही दिवस झाले आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे की, बॅटरी तीन ते चार वर्षे तरी टिकायला हवी, मात्र पाच ते सहा महिन्यांत बॅटरी कशी काय बर खराब झाली? तर असा मी विचार करू लागलो व मी इंटरनेट वरती सर्च केले आणि त्यावेळी मला जी माहिती समजली ती आपण चार्जिंग करताना कोणत्या चूका करतो, तर ही महत्वाची माहिती मला वाटले तुमच्या पर्यंत मी शेअर करायला हवी जेणे करून आपले हे जे नुकसान आहे ते टाळता येईल. बऱ्याचदा आपण मोबाईल विकत तर घेतो मात्र त्यामध्ये ज...

हिमायतनगर बाजार चौक येथील मुस्लिम शमशान भूमिमध्ये हायम्यक्स पावर लाईट लावन्याची मागणी

Image
हिमायतनगर बाजार चौक येथील मुस्लिम शमशान भूमिमध्ये हायम्यक्स पावर लाईट लावन्याची मागणी प्रतिनिधि /हिमायतनगर अजीम सय्यद आज दिनांक 22/06/2020 रोजी हिमायतनगर नगर पंचायत कार्यालयास मुस्लिम शमशान भूमि कब्रस्तान मध्ये हायम्यक्स पावर लाईट पोल बसविण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली वास्तविक पाहता बाजार चौक येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये अनेक वर्षापासून लाईट नाही. व तसेच रात्री अंधार असल्याने अंतविधि साठी जाणाऱ्या नागरिकांना अंधारचे सामना करवा लागत आहे . कब्रस्तान मध्ये जाण्यासाठी विषारी विंचु, कीडेची भीति निर्माण होत असुन विषारी विंचु, कीडेने जीवित हानी होऊ शकते त्या अगोदर साहेबानी तात्काळ लाईट पोल लावन्याची परवानगी द्यावी असे हिमायतनगर मुस्लिम समाजातील नागरिकानी मागणी केली आहे. यावेळी माजी नगर सेवक जनसेवक सरदार खान, जफर लाला अल्प संख्यक तालुका शिवसेना अध्यक्ष, अजिम हिंदुस्तानी (सामाजिक कार्यकर्ता) तमाजिद खुरेशी, खदिर खुरेशी, सईद खुरेशी,आदीनीचे निवेदनावर सही आहेत .

अल्पसंख्यांक , मागास वर्गीय , वंचित समूहावर होणाऱ्या अन्याय अत्याचार वाढत असुन संबधितावर कठोर कार्यवाही करावी- युवा पँथर मुखेड

Image
मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद शिव , फुले , शाहू आंबेडकराच्या पुरोगामी महाराष्ट्रात मागासवर्गीय युवकांवर  अन्याय अत्याचार करुन खुन करणे हल्ले करणे अशा घटना काही थांबायला तयार नाहीत महाराष्ट्रात स्वतः ला पुरोगामी समजविणार्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे . पण सरकार मागासवर्गीया वरील हल्ले रोखण्यासाठी अपयशी ठरले आहे .पुणे जिल्हयातील विराज जगताप ऑनर किलिंग नागपूर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ता अरविंद बनसोड यांची हत्या व काही आठवड्यापूर्वी बीड जिल्हयात आदिवासी समाजातील एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आसुन या निवेदनाची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रतील अल्पसंख्यांक , मागास वर्गीय , वंचित समूहाच्या युवकांच्या खुन हत्या अन्याय आत्याचार करणार्यां आरोपींवर अँट्रासीटी अँक्ट व खुनाचे खटले भरून त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा व तमाम मागासवर्गीय समाज बांधवांना न्याय द्यावे अन्यथा युवा पँथरच्या वतीने महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा पँथर या सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे निवेदनादारे केली आहे . याव...

सागरगड माची वासियांना आ. जयंत पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Image
सागरगड माची वासियांना आ. जयंत पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप अलिबाग तालुक्यात 'निसर्ग' चक्रीवादळाने भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ग्रुप ग्रामपंचायत खंडाळा हद्दीतील सागरगड माची येथील अनेक घरांचे, समाजमंदिरांचे, अंगणवाडीचे पत्रे उडून जाऊन मोठे नुकसान झाले होते, आमदार जयंत पाटील यांनी पाहणी करून स्वखर्चातून लाखो रुपयांचे पत्रे दिले होते आणि आज त्यांच्या हस्ते सरकारी धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार सचिन सेजाळ, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, माजी जि. प. सदस्य संजय पाटील,  जि. प. सदस्या प्रियदर्शनी पाटील, उपसभापती मीनल माळी, ग्रामपंचायत चेंढरे माजी सदस्य अजित माळी, ग्रुप ग्रामपंचायत खंडाळेच्या सरपंच रंजना नाईक, उपसरपंच संतोष कनगुटकर, माजी सरपंच नासिकेत कावजी, विलास वालेकर, नरेश गोंधळी, विलास थळे व इतर शेकापचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

Image
शेकाप च्या  मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद खरीप हंगामाचे पेरणीचे दिवस जवळ येत आहेत परंतु शेतकरी कर्ज माफी योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना  सीएससी केंद्रात जाऊन आधार व्हेरिफिकेशन करणे आवश्यक होते. त्या नंतरच नवीन कर्ज वाटप प्रक्रिया सुरू सुरू होईल असे बँका कडून सांगण्यात येत होते या मुळे शेतकऱ्यांची बँका आणि सीएससी केंद्रावर पायपीट करावी लागत होती.शासनाने कर्जमाफी योजनेची साईट बंद केल्या मुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. हीच बाब विचारात घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार व मुखेड तालुक्याचे  शहर चिटणीस भाई आसद बल्खी यांनी दि.16 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे सीएससी केंद्रावर कर्जमाफी योजनेची साईट सुरू करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या मागणी ची तात्काळ दाखल घेत दि.17 रोजी सिएससी केंद्रावरील कर्जमाफी योजनेची साईट सुरू केली आहे. त्या मुळे शेकाप चा मागणी नंतर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुखेड वासीयांना थोडा मोकळा श्वास मिळाला 105 पैकी 101 अहवाल निगेटिव्ह तर केवळ 4 प्रलंबित

Image
मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद  अंत्यविधीला गेलेले मुखेड येथील 13 जण पॉझिटिव्ह आढळल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती . या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आमदारांसह अनेक लोकांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली होती काही संशयितांचा अहवाल अनिर्णित असल्याने त्यांच्या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेल  होते . मागील आठवड्यात मुखेडच्या एकाच कुटुंबातील 2 जण बाधित असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील शंभराहून अधिक जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते.  त्यानंतर 5 आणि नंतर 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  यात मुखेड येथील राजकीय पक्षाच्या एका डॉक्टर आणि व्यापाराचा समावेश होता.  माहिती कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ . नागेश लखमावार यांनी दि . 18 रोजी दिलेल्या माहिती नुसार रुग्णांच्या संपर्कातील 105 अहवाल पैकी 101 अहवाल निगेटिव्ह आले असून केवळ 4 अहवाल प्रलंबित असल्याची . सलग दोन दिवस मुखेड वासीयांची सकाळ कोरोनाने होत होती पण आज कोरोनाने दिलासा दिल्याने मुखेड वासीयांना थोडा मोकळा श्वास मिळाला आहे .

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

Image
मुस्लीम धर्मगुरु अजमेर चे जगप्रसिध्द दर्गाचे हजरत खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण यांनी अपशब्द बोलुन धार्मीक भावना दुखवल्या बद्दल व दोन समाजात तेढ निर्माण केल्या बद्दल   गुन्हा दाखल करा दि 15.06.2020 रोजी संध्याकाळी 7.36 ) वा . न्युज 18 या वृत्त वाहीणीवर अमिष देवगण नावाचे एंकर ' आर पार ' या नावाचे डिबेट घेत होते  बोलता बोलता त्यांनी अजमेर दर्गाचे खॉजा मौनोदिन चिस्ती बदल खालील प्रकारचे अशब्द बोलले ज्यामुळे मुस्लीम समाजाचे धार्मीक भावना दुखावले गेले आहे.'अंक्राता चिस्ती आया , लुटेरा चिस्ती आया इसके बाद धर्म बदले ' असे प्रकारचे अपशब्द वारंवार बोलण्यात आला हजरत खॉजा मैनोद्दिन चिस्ती हे जगप्रसिध्द मुस्लीम धर्म गुरु आहे व आज ही भारतात व जगात त्यांचे करोडो अनुयायी मुस्लीम शिवाय इतर समाजाचे लोक पण त्यांचे अनुयायी आहेत आणि ही बाब अमिष देवगण सारखे बे अकली एंकर ला माहित नाही अस नाही त्याने जाणुन बूजुन धर्मगुरु बदल अपशब्दाचा वापर केला आहे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केले असुन जगातल्या तमाम मुस्लीम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत . म्हणुन न्...

खरीप हंगामासाठी तात्काळ बँकांनी कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश देण्याची शेकापची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!

Image
खरीप हंगामासाठी तात्काळ बँकांनी कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश देण्याची शेकापची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..! मुखेड /प्रतिनिधि :-        खरीप हंगामाची पेरणी करण्याचे दिवस जवळ आले आहेत परंतु अजून पर्यंत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याच बँके कडून कर्ज वाटप सुरू केले नाही. तसेच शासनाचा कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ही नवीन कर्ज वाटप सुरू केलेले नाही त्या मुळे तात्काळ बँकांना आदेश देऊन कर्ज वाटप सुरू करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे मुखेड शहर चिटणीस भाई आसद बल्खी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.          नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत ऑनलाईन कर्ज मागणीचे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. परंतू आज पर्यंत त्या वर काहीच कार्यवाही सुरू झाली नाही. महा आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्ज माफी योजनेत जे शेतकरी पात्र आहेत.त्यांना व नवीन खातेदारांना बँका कर्ज वाटप करण्यास चालढकल करत आहेत. तसेच कर्ज माफी यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना सी. एस. सी केंद्रावर जाऊन आधार लिंक करायचे आहे परं...

इंग्रजी माध्यमांकडुन होणारे आर्थिक व मानसिक शोषण खपवुण घेतले जाणार नाही- संभाजी ब्रिगेड

Image
इंग्रजी माध्यमांकडुन होणारे आर्थिक व मानसिक शोषण खपवुण घेतले जाणार नाही- संभाजी ब्रिगेड नांदेड : कोरोना सारख्या जागतिक संकट असतांना देखील आॅनलाईन शिक्षणाच्या नावावर खाजगी इंग्रजी शाळांकडुन  विद्यार्थी व पालकांचे ज्याप्रकारे माणसीक,आर्थिक शोषण चालु आहे ते संभाजी ब्रिगेड खपवुण घेणार नाही असे निवेदन संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंञ्यांना पाठविले आहे.      मुख्यमंञ्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की कोरोणासारख्या जागतिक संकटाशी आपण संपुर्ण उत्तरादायीत्वाच्या भावनेतुन लढत आहात.त्याबद्दल अभिनंदन.आपल्या आव्हानाला प्रतिसाद देत संभाजी ब्रिगेड ने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिरे, अन्नछत्र, गरजूंना मदत करून या लढ्यात सहभाग दर्शविला आहे.      सध्या कोरोणा संकटामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही मात्र राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक  शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केले आहे. यासाठी रोज मुलांना साधारणतः 3 ते 4 तास मोबाईल बघत कानात कॉड टाकून बसावे लागत आहे याचा मुलांच्या  आरोग्यावर विपरीत प...

नांदेडमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; पहिल्यांदाच तब्बल 24 रुग्णांची भर तर मुखेड तालुक्यात भीतीचा वातावरण

नांदेडमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; पहिल्यांदाच तब्बल 24 रुग्णांची भर मुखेड तालुक्यात भीतीचा वातावरण   एकाच दिवशी सर्वात जास्त रुग्णांची नोंद, बाधित रुग्ण संख्या 286 झाली तर  3 रुग्णांना सुट्टी नांदेड दि 16 जून: नांदेडमध्ये कोरोना चा धुमाकूळ सुरूच असून मंगळवारी एकाच दिवशी 24 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. दररोज ही संख्या झपाट्याने वाढत असून ही संख्या 300 च्या जवळ येऊन ठेपली आहे. नांदेड जिल्ह्यातील मंगळवार दिनांक 16 जून 2020 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 3 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या रुग्णांची संख्या 180 एवढी झाली आहे.  आज 16 जून रोजी प्राप्त झालेल्या एकूण 278 अहवाला पैकी 230 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले, व 24 अहवाल हे पॉझिटिव प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 286 एवढी झाली आहे. यामध्ये 14 पुरुष व 10 महिला रुग्णांचा समावेश आहे.  सदरील सर्व रुग्ण हे खालील भागातील आहे : - •  सोमेश कॉलनी 4 - 3 पुरुष रुग्ण,   वय वर्ष अ...

मध्यरात्री 4 तर सकाळी 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल, त्या बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 12 जणांचा समावेश; बाधित रुग्ण संख्या 280 वर

Image
नांदेडमध्ये कोरोनाचा उद्रेक; सकाळी 14 अहवाल पॉझिटिव्ह मध्यरात्री 4 तर सकाळी 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल, त्या बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 12 जणांचा समावेश;  बाधित रुग्ण संख्या 280 वर नांदेड दि 16 जून: आज सकाळी प्राप्त अहवालानुसार 14 रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने नांदेड जिल्ह्यातील बाधित संख्या ही 280 वर पोहोचली आहे. नांदेडच्या वजिराबाद भागातील बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील बाधितांच्या संपर्कात जवळपास 12 पुरुष व महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अन्य 2 रुग्ण हे शहराच्या अन्य रुग्णांच्या संपर्कातून संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी 5 रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर मंगळवारी मुखेड तालुक्यात आणखी 4 रुग्णांची भर पडली त्यामुळे मुखेड तालुक्यातील रुग्ण संख्या आता 19 झाली आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या 4 जणांमध्ये मुखेड शहरातील 3 चा समावेश आहे तर 1 जण पाखंडी ता मुखेड येथील रहिवासी आहे. आजपर्यंत 177 रुग्ण हे आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 13 जणांचा औषधउपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्य...

मुखेड आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह, तालुका बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट एकूण आकडा संख्या 19 वर

Image
जिल्ह्यात रात्री उशीरा आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण आकडा 266 वर मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद नांदेड दि. 16 जून- सोमवार दि 15 जून रोजी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या एकूण 118 अहवाला नुसार  111 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 3 अहवाल अनिर्णीत आले असून  4 अहवाल पॉसिटीव्ह आल्याने जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या आता 266  झाली आहे.  सोमवार दि. 15 जून रोजी सकाळी 6 रुग्णांची भर पडली होती या मध्ये एक रुग्ण नांदेड शहरातील बरकतपूरा या भागातील होता तर इतर 5 रुग्ण हे मुखेड तालुक्यातील विठ्ठल मंदिर ह्या भागातील होते. आता उशीरा प्राप्त झालेले 4 रुग्ण हे याच भागातील असून ते ह्या 5 रुग्णांच्या संपर्कातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये 3 पुरुष व एका महिला रुग्णाचा समावेश आहे. पुरुष ज्यांचे वय (अनुक्रमे वय वर्ष - 30, 11, 38)व एक स्त्री रुग्ण (वय वर्ष  - 50) असून सर्व रुग्ण विठ्ठल मंदिर परिसर मुखेड या ठिकाणचे रहिवासी आहेत. आतापर्यंत 266 रुग्णांपैकी 177 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 13 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 7...

आजपासून राज्यात ऑनलाईन शाळा सुरु, शिक्षकांनाही वर्कफ्रॉम होम सरकारचा निर्णय

Image
आजपासून राज्यात ऑनलाईन शाळा सुरु, शिक्षकांनाही वर्कफ्रॉम होम सरकारचा निर्णय राज्यात आजपासून प्रत्यक्ष शाळा सुरु होणार नसली तरी आजपासून ऑनलाईन शाळा सुरु झाल्या आहेत. तसेच शिक्षकांनाही वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आलं आहे. मुंबई दि.१५, जून : देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनामुळे यंदा शाळा प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून वाट पाहावी लागणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. नव्या कोऱ्या वह्या-पुस्तकांसह नाही तर यंदाचं शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरु होणार आहे. असं असलं तिरीही अद्याप शिक्षण विभागाकडून कोणत्याही सुचना किंवा गाइडलाइन्स जारी करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष कसं सुरु करायचं? हा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांच्यासमोर उभा राहिला आहे. दरवर्षी जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. यंदा मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्यक्षात शाळा सुरु न करता, ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक वर्ष सु...

घरी रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा वाढदिवसा निमित्य मुखेडच्या जनतेला केले आव्हान :-एस के बबलु

Image
घरी रहा सुरक्षित रहा Dr APJ अब्दुल कलाम समाज सेवा समितिचे अध्यक्ष एस के बबलु भाई यांनी आपल्या वाढदिवसा निमित्य मुखेडच्या जनतेला केले आव्हान   मुखेड तालुक्यातील  सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे धडाडीचे कार्यकर्ते बबलु भाई सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व धर्माच्या लोकांना घेऊन कार्य करत असतात आज यांच्या वाढदिवस निमित्य आपल्या मित्र परिवारांना  विनंती केली की जास्त जलोष मुद्दे न करता  फक्त फोन द्वारे, सोशलमीडिया मार्फत मला शुभेच्छा दिले तरी ही मी सतत आपला ऋणी राहील केक,फुल,शाल काही हीं आनु नये असे त्यांनी सोशलमीडियामार्फत मित्र परिवारांना विनंती केली आहे.  घरी रहा सुरक्षित रहा देशभरातील परिस्थिती एवढी चांगली नाहीये आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती नक्कीच गंभीर झाली आहे.पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक , अंगणवाडी सेविका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, पत्रकार बांधव आपल्या जीवाशी खेळून देशासाठी लढत आहेत, होय लढत आहेत तेही कोरोनारुपी अदृश्य शत्रूसोबत.......... आणि आपल्यापैकी बरेच जण काय करतोय तर यांच्या मेहनतीवर पाणी फेकणे हो तेच करतोय आपण आहो...

नांदेड पुन्हा सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव तर 5 रुग्ण हे मुखेड येथील रुग्णाची एकूण संख्या 262

Image
कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये पाच 5 रुग्ण हे मुखेड तर एक रुग्ण हा नांदेड शहरातील आहे.   प्रतिनिधी बल्खी आसद नांदेड :- रविवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार 6 अहवाल प्राप्त झाले आहेत यामुळे नांदेड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 262 वर पोहोचली आहे. आज प्राप्त अहवालानुसार एकाच कुटुंबातील 3 तर 1 व्यापारी तर 1 राजकीय नेत्याचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहरातील बरकतपुरा या भागातील 1 पुरुष (वय वर्ष 32) असून सध्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत. मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी, विठ्ठल मंदिर येथील या भागात आढळले आहेत. यामध्ये 3 पुरुष (वय वर्ष अनुक्रमे 62, 52 व 47) तर मुखेड शहरातील 2 महिला वय वर्ष 55 व 52 बाबन हे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदर रुग्णांची सध्या स्थितीत प्रकृती स्थिर आहे. मुखेड मध्ये हे पाच व अगोदरचे 2 असे 7 जणांवर उपचार चालू असून या अगोदर 8 जणांना सुट्टी देण्यात आली आहे . तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 15 अशी झाली आहे . नागरिकांना आवाहन: * स्वतः ची व इतरांची काळजी घ्या. * अत्यावश्यक कामाशिवाय  बाहेर...

नांदेड: गोदावरी नदीपात्रातील दुषित पाण्याने अचानक लाखो माशांचा मृत्यू

Image
नांदेड: गोदावरी नदीपात्रातील दुषित पाण्याने अचानक लाखो माशांचा मृत्यू नांदेड :- आज सकाळी नगीनाघाट येथे लाखोंच्या संख्येत मरण पावलेली मासे पाहून नांदेडमध्ये एक नवीनच भीती पसरली आहे. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या अंतर्गत सफाई करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी देण्यात आला होता, पण अद्यापही शहरातील अनेक नाल्यांमधून घाण पाणी वाहत नदीत येते. नदीच्या काठावर आज दिनांक 12 जून रोजी सकाळी मेलेल्या माशांचा थर नदीत दिसला. सर्वत्र नदीत मासेच मासे दिसत होते आणि ते सुद्धा मेलेले.  गेले काही दिवस नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. पाणीपातळीत थोडीशी वाढ झाली असली तरी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत नाहिये. आज अचानक नदीत मासे मृत्युमुखी पडले, नदीकाठी मृत माशांचा खच पडला असून नदीकाठी तीव्र दुर्गंधी पसरली आहे. लाखो माशांच्या मृत्यूमुळे नांदेड शहरासह महापालिकेचे प्रदूषण नियंत्रण मंडळ हादरले आहे.  लाखो मृत माशांचा ढीग लागला आहे, नदीपात्रात रसायन मिश्रीत पाणी प्रक्रिया न करता सोडल्याने किंव्हा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नांदेडच्या...

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिवसभरातून तीन तास ऑनलाईन शिक्षण दिले जाणार :- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Image
नववी ते बारावीसाठी 3 तास, ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षण विभागाकडून प्रस्ताव तयार | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिवसभरातून तीन तास ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शिक्षण विभागाकाडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला आहे. शिक्षण खात्याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या प्रस्तावानुसार, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि दुसऱ्या वर्षाच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार नाही. तर तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना एका तासासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जाईल. तर पाचवी-सहावीच्या मुलांनी दोन तास ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल. त्याशिवाय नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना तीन तास ऑनलाईन शिक्षण दिलं जाणार आहे. राज्य सरकार लवकरच याबाबतचे निर्...

पंतप्रधान मोदींच्या योजनांचा बोलबोला? :- ज्येष्ठ पत्रकार,कमलाकर जोशी

Image
पंतप्रधान मोदींच्या योजनांचा बोलबोला? :- ज्येष्ठ पत्रकार, कमलाकर जोशी   नांदेड :- मला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीचे पत्र मिळाले,बरे वाटले!यात आश्चर्य म्हणजे! पंतप्रधान मोदींनी भारतीयांना उद्देशून लिहिलेले सार्वजनिक पत्र आहे.ते पत्र नांदेड भाजपाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मला दिले गेले.पंतप्रधानांच्या पत्रात सरकारने दुसर्‍या टप्यात केलेल्या कांही निर्णयाचा अल्लेख  तसेच करोना महामारीचा मुकाबला करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.भारतीय माणूस विसरभोळा आहे. त्यामुळे या पत्राचा प्रपंच असावा.मोदी सरकारने दुसर्‍या टप्यात अनेक धाडसी व महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.यात महत्वाचा जम्मू काश्मिरबाबत घटनेतील विशेष ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला.त्यामुळे तेथे आता भारतीय संसदेने संमत केलेले कायदे व योजना लागू होतील. स्वातंत्र्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी काश्मीरसाठी स्वतंत्र घटना लिहिण्यास नकार दिला होता,तरी पण काँग्रेसने या राज्यासाठी स्वतंत्र घटना तयार केली.त्यामुळेच काश्मीरघाटीत पाकिस्तानचा हस्तक्षेप वाढला. इतकेच नव्हे पाकधार्जिण्यांची संख्या वाढली.१९९० मध्ये कश्मीर पंडीत...

SFI,DYFI च्यावतीने अंबुलगा येथे राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या विरोधात निषेध करण्यात आला!

Image
SFI,DYFI च्यावतीने अंबुलगा येथे राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या  विरोधात निषेध करण्यात आला! मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद पुणे जिल्ह्यातील विराज जगतापची ऑनर किलिंग, नागपूर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरविंद बनसोडे यांची हत्या व काही आठवड्यापूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालूक्यात मांगवडगाव येथील एकाच आदिवासी कुटुंबातील तिघांची हत्या या व अशा इतर सर्व प्रकरणांची कायदेशीर चौकशी करून ते विशेष न्यायालयात चालवली जाऊन संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारावाई करण्यात यावी.तसेच कायद्यातील तरतुदींनुसार अत्याचारग्रस्त सर्व कुटुंबांना आर्थिक साहाय्य व अन्य मदत करण्यात यावी.त्याचबरोबर राज्यात वाढत चाललेल्या जातीय अत्याचाराला रोखण्यासाठी योग्य अशा कठोर उपाय योजना करण्यात यावे,आदी मागण्यांना घेऊन एसएफआयने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील अंबूलगा(बू.) येथे राज्यात वाढत चाललेल्या दलित -आदिवासींवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात SFI चे माजी राज्य सचिव कॉम्रेड विनोद गोविंदवार यांनी महाराष्ट्रातील जातीय अत...

"श्यामची आई" ची कृतीयुक्तता हे संस्कारपीठच :- धनंजय गुडसूरकर

Image
"श्यामची आई" ची कृतीयुक्तता हे संस्कारपीठच:- धनंजय गुडसूरकर         मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद "श्यामची आई ने केलेली मुल्यांची पेरणी कालातीत आहे,हे संस्काराचे मोती नव्या पिढीसाठी प्रेरक असून श्यामची आई ची कृतीयुक्तता ही हे संस्कारपीठच आहे" असे प्रतिपादन साने गुरूजींच्या साहित्याचे अभ्यासक धनंजय गुडसूरकर यांनी ऑनलाईन संवादात केले.      साने गुरुजींच्या स्मृतीदिनानिमित्त "आई श्यामची व मम्मी आजची" या विषयावर गुडसूरकर यांच्या आॕनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते."दीडशे वर्षाआधी जन्मलेल्या आणि शतकापूर्वी हे जग सोडून गेलेल्या य आईच्या विचाराची आज उपयुक्तता काय?"असा प्रश्न आज उपस्थित होणे स्वाभाविक आहे."मात्र या माऊलीने वर्तनातून केलेले संस्कार आणि विचारांची पेरणी ही काळाच्या कसोटीवर टिकणारी आहे.सभोवतालची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना त्या परिस्थितीला शरण न जाता आपल्या विचारांशी व तत्वांशी कायम राहून तिने केलेला संघर्ष श्यामला घडवून गेला.एका बुज-या मुलाचे रुपांतर सेनानी मध्ये झाले.सामाजिक भूमिका घेताना कणखरपणे जगणाऱ्या साने गुर...

रज्जाक कुरेशी यांना कोरोना योद्धा पुरस्कार

Image
रज्जाक कुरेशी यांना कोरोना योद्धा पुरस्कार मुक्रमाबाद /प्रतिनिधी:- सय्यद बाबा मुक्रमाबाद येथील धडाडीचे व निर्भीड पञकार रज्जाक कुरेशी यांना लातूर येथील सप्तफेरे वधु-वर सुचक केंद्राच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार संचालक संजय राजुळे यांच्या हस्ते  दि.10 रोजी देण्यात आले.        मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे धडाडीचे व निर्भीड पञकार रज्जाक कुरेशी हे सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना महामारीच्या संकट काळात हातावर पोट असणाऱ्या  अनेक गरजुं कुटुंबाना अन्नधान्य वाटप करुन मदतीचा हात दिला आहे.व पोलीस कर्मचाऱ्यांचीही काळजी घेत त्यांना  मास्क व सँनीटायझर वाटप केले केले असुन आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन च्या काळात वार्तांकण करुन जनतेपर्यंत माहीती पोहचवीली आहे.त्यांच्या या छोट्याशा कार्याची दखल घेत लातूर येथील सप्तफेरे वधु-वर सुचक केंद्राचे संचालक संजय राजुळे यांनी पञकार रज्जाक कुरेशी यांना  कोरोना योद्धा पुरस्कार 2020  व सन्मान पञ देवुन गौरविण्यात आले ,पञकार रज्जाक कु...