खरीप हंगामासाठी तात्काळ बँकांनी कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश देण्याची शेकापची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!

खरीप हंगामासाठी तात्काळ बँकांनी कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश देण्याची शेकापची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!

मुखेड /प्रतिनिधि :-
      
खरीप हंगामाची पेरणी करण्याचे दिवस जवळ आले आहेत परंतु अजून पर्यंत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याच बँके कडून कर्ज वाटप सुरू केले नाही. तसेच शासनाचा कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ही नवीन कर्ज वाटप सुरू केलेले नाही त्या मुळे तात्काळ बँकांना आदेश देऊन कर्ज वाटप सुरू करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे मुखेड शहर चिटणीस भाई आसद बल्खी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.
         नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत ऑनलाईन कर्ज मागणीचे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. परंतू आज पर्यंत त्या वर काहीच कार्यवाही सुरू झाली नाही. महा आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्ज माफी योजनेत जे शेतकरी पात्र आहेत.त्यांना व नवीन खातेदारांना बँका कर्ज वाटप करण्यास चालढकल करत आहेत. तसेच कर्ज माफी यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना सी. एस. सी केंद्रावर जाऊन आधार लिंक करायचे आहे परंतु शासनाने सीएससी केंद्राची साईट बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकत नाही त्या मुळे सीएससी केंद्र तात्काळ सुरू करून बँकांना कर्ज वाटप बद्दल आदेशित करावे अशी मागणी मुख्यमंत्री यांच्या कडे ईमेल द्वारे करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.