लो चोरो बाँधो भारा अदा तुम्हारा आधा हमारा व्यापारी मालामाल , शेतकऱ्यांचे बेहाल ! दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी कर्जाच्या कचाट्यात


आजी - माजी आमदारांचे दुर्लक्
आजी - माजी आमदारांचे दुर्लक्ष

मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद

बनावट कंपन्याच्या नावाखाली निकृष्ट बियाण्यांची पॅकींग करून नफा कमावलेले व्यापारी मालामाल झाले आहेत तर दुबार पेरणीचे संकट समोर उभे ठाकल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या कचाट्यात सापडल्याची स्थिती तालुक्यात निर्माण झाली असून बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांतून केली जात आहे . कृषी सेवा केंद्रांनी चक्क चाळणी केलेले सोयाबीन विविध बँडच्या नावाखाली बनावट सील व बॅच लाऊन पॅकिंग केल्याची चर्चा आहे . सातशे रुपयांचे सोयाबीन कंपनीच्या नावाखाली बावीसशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत विक्री केली . यामुळे जे
घडायचे तेच घडले , मृगाच्या पावसात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसून कोणतीही प्रक्रिया नसणारे बियाणे जळून गेल्याने उगवणच झाली नाही . असा प्रकार तालुक्यात सर्वच ठिकाणी झाला असून जास्तीचा नफा कमविण्याच्या हेतूने व्यापाऱ्यांनी केलेली करामत शेतकऱ्यांच्या मरणावर येऊन ठेपली आहे . बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यास त्यांना त्रोटक उत्तरे देऊन पिटाळण्यात आले . यानंतर काही शेतकऱ्यांनी अधिकची चौकशी केली
असता त्यांना पावत्या आणण्यासाठी सांगण्यात आले व ज्यांनी पावत्या आणल्या त्यांना दुसऱ्या कोणत्या तरी बॅगा देऊन पळविण्यात आले व ज्यांनी पैसे परत मागितले त्यांच्याशी हमरीतुमरी करीत मनुष्यबळाचा वापर करून हाकलून देण्यात आल्याची घटना घडल्या आहेत . यामुळे शेतकरी पुरता डबघाईला आला असून वेळ वाया जात असल्याचे पाहून पुन्हा दुबार पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळव करण्यात गुंतला असल्याचे चित्र दिसत आहे .

 आजी - माजी आमदारांचे दुर्लक्ष एकीकडे शेतकऱ्यांचा सातत्याने कैवार घेणारे स्वयंघोषित शेतकरी नेते व आजी - माजी आमदार , सामजिक कार्यकर्ते , पंचायत समितीचे कृषी अधिकारी मात्र बनावट बियाणाच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसले आहेत . यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत असून आमचा कोणी वाली नाही व आमचे कोणीच एकत नसल्यास आता आम्हीच व्यापाऱ्यांना ठोकून काढणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत .

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान