इंग्रजी माध्यमांकडुन होणारे आर्थिक व मानसिक शोषण खपवुण घेतले जाणार नाही- संभाजी ब्रिगेड
नांदेड : कोरोना सारख्या जागतिक संकट असतांना देखील आॅनलाईन शिक्षणाच्या नावावर खाजगी इंग्रजी शाळांकडुन विद्यार्थी व पालकांचे ज्याप्रकारे माणसीक,आर्थिक शोषण चालु आहे ते संभाजी ब्रिगेड खपवुण घेणार नाही असे निवेदन संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंञ्यांना पाठविले आहे.
मुख्यमंञ्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की कोरोणासारख्या जागतिक संकटाशी आपण संपुर्ण उत्तरादायीत्वाच्या भावनेतुन लढत आहात.त्याबद्दल अभिनंदन.आपल्या आव्हानाला प्रतिसाद देत संभाजी ब्रिगेड ने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिरे, अन्नछत्र, गरजूंना मदत करून या लढ्यात सहभाग दर्शविला आहे.
सध्या कोरोणा संकटामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही मात्र राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केले आहे. यासाठी रोज मुलांना साधारणतः 3 ते 4 तास मोबाईल बघत कानात कॉड टाकून बसावे लागत आहे याचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच या कालावधीत शिकवून झालेला अभ्यासक्रम परत क्लासरूमच्या च्या माध्यमातून होणार की नाही याबाबत शंका वाटते. असे झाल्यास लहान वयोगटातील विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होऊ शकते. ऑनलाईन क्लासेस हा प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील पर्याय होऊ शकत नाही.
अनेक शाळा ऑनलाईन क्लासेच चा बहाणा करून शाळा सुरू झाल्याचे भासवून पालकांना फिस ची रक्कम भरायला भाग पाडत आहेत. कोरोना मुळे आधीच अडचणीत असलेल्या लोकांना परत हा मानसिक त्रास होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने ठोस पावले उलण्याची गरज आहे. तरी कृपया आपण शाळांच्या या आडमुठे धोरणाला तत्काळ चाप बसविण्यासाठी निर्णय घ्यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड ला पालकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंञ्यांना देण्यात आले. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष शाम पाटील, जिल्हाध्यक्ष भगवान कदम, सुभाष कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Comments
Post a Comment