मुखेड वासीयांना थोडा मोकळा श्वास मिळाला 105 पैकी 101 अहवाल निगेटिव्ह तर केवळ 4 प्रलंबित


मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद 

अंत्यविधीला गेलेले मुखेड येथील 13 जण पॉझिटिव्ह आढळल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती . या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आमदारांसह अनेक लोकांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली होती काही संशयितांचा अहवाल अनिर्णित असल्याने त्यांच्या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेल  होते .

मागील आठवड्यात मुखेडच्या एकाच कुटुंबातील 2 जण बाधित असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील शंभराहून अधिक जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते.  त्यानंतर 5 आणि नंतर 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  यात मुखेड येथील राजकीय पक्षाच्या एका डॉक्टर आणि व्यापाराचा समावेश होता.

 माहिती कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ . नागेश लखमावार यांनी दि . 18 रोजी दिलेल्या माहिती नुसार रुग्णांच्या संपर्कातील 105 अहवाल पैकी 101 अहवाल निगेटिव्ह आले असून केवळ 4 अहवाल प्रलंबित असल्याची . सलग दोन दिवस मुखेड वासीयांची सकाळ कोरोनाने होत होती पण आज कोरोनाने दिलासा दिल्याने मुखेड वासीयांना थोडा मोकळा श्वास मिळाला आहे .

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान