मुखेड आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह, तालुका बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट एकूण आकडा संख्या 19 वर
जिल्ह्यात रात्री उशीरा आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण आकडा 266 वर
सोमवार दि. 15 जून रोजी सकाळी 6 रुग्णांची भर पडली होती या मध्ये एक रुग्ण नांदेड शहरातील बरकतपूरा या भागातील होता तर इतर 5 रुग्ण हे मुखेड तालुक्यातील विठ्ठल मंदिर ह्या भागातील होते.
आता उशीरा प्राप्त झालेले 4 रुग्ण हे याच भागातील असून ते ह्या 5 रुग्णांच्या संपर्कातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये 3 पुरुष व एका महिला रुग्णाचा समावेश आहे. पुरुष ज्यांचे वय (अनुक्रमे वय वर्ष - 30, 11, 38)व एक स्त्री रुग्ण (वय वर्ष - 50) असून सर्व रुग्ण विठ्ठल मंदिर परिसर मुखेड या ठिकाणचे रहिवासी आहेत.
आतापर्यंत 266 रुग्णांपैकी 177 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 13 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 76 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
या रुग्णांमध्ये एक स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष 52 व 54 आहेत. तर 5 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे.
दि १५ जून रोजी नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल
•दिवसभरात 10 पॉझिटिव रुग्णांची भर.
• एकूण रुग्ण संख्या 266 वर.
• आत्तापर्यंत 177 बरे होऊन घरी
•2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
•13 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
•76 रुग्णांवर उपचार सुरू.
•1 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
• 5 रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.
नांदेड दि. 16 जून- सोमवार दि 15 जून रोजी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या एकूण 118 अहवाला नुसार 111 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 3 अहवाल अनिर्णीत आले असून 4 अहवाल पॉसिटीव्ह आल्याने जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या आता 266 झाली आहे.
सोमवार दि. 15 जून रोजी सकाळी 6 रुग्णांची भर पडली होती या मध्ये एक रुग्ण नांदेड शहरातील बरकतपूरा या भागातील होता तर इतर 5 रुग्ण हे मुखेड तालुक्यातील विठ्ठल मंदिर ह्या भागातील होते.
आता उशीरा प्राप्त झालेले 4 रुग्ण हे याच भागातील असून ते ह्या 5 रुग्णांच्या संपर्कातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये 3 पुरुष व एका महिला रुग्णाचा समावेश आहे. पुरुष ज्यांचे वय (अनुक्रमे वय वर्ष - 30, 11, 38)व एक स्त्री रुग्ण (वय वर्ष - 50) असून सर्व रुग्ण विठ्ठल मंदिर परिसर मुखेड या ठिकाणचे रहिवासी आहेत.
आतापर्यंत 266 रुग्णांपैकी 177 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 13 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 76 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
या रुग्णांमध्ये एक स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष 52 व 54 आहेत. तर 5 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे.
दि १५ जून रोजी नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल
•दिवसभरात 10 पॉझिटिव रुग्णांची भर.
• एकूण रुग्ण संख्या 266 वर.
• आत्तापर्यंत 177 बरे होऊन घरी
•2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
•13 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
•76 रुग्णांवर उपचार सुरू.
•1 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
• 5 रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.

Comments
Post a Comment