मध्यरात्री 4 तर सकाळी 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल, त्या बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 12 जणांचा समावेश; बाधित रुग्ण संख्या 280 वर

नांदेडमध्ये कोरोनाचा उद्रेक; सकाळी 14 अहवाल पॉझिटिव्ह

मध्यरात्री 4 तर सकाळी 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल, त्या बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 12 जणांचा समावेश;  बाधित रुग्ण संख्या 280 वर


नांदेड दि 16 जून: आज सकाळी प्राप्त अहवालानुसार 14 रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने नांदेड जिल्ह्यातील बाधित संख्या ही 280 वर पोहोचली आहे.

नांदेडच्या वजिराबाद भागातील बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील बाधितांच्या संपर्कात जवळपास 12 पुरुष व महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अन्य 2 रुग्ण हे शहराच्या अन्य रुग्णांच्या संपर्कातून संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी 5 रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर मंगळवारी मुखेड तालुक्यात आणखी 4 रुग्णांची भर पडली त्यामुळे मुखेड तालुक्यातील रुग्ण संख्या आता 19 झाली आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या 4 जणांमध्ये मुखेड शहरातील 3 चा समावेश आहे तर 1 जण पाखंडी ता मुखेड येथील रहिवासी आहे.

आजपर्यंत 177 रुग्ण हे आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 13 जणांचा औषधउपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरित 90 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
या रुग्णांमध्ये एक स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष  52 व 54 आहेत.  तर 5 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान