अल्पसंख्यांक , मागास वर्गीय , वंचित समूहावर होणाऱ्या अन्याय अत्याचार वाढत असुन संबधितावर कठोर कार्यवाही करावी- युवा पँथर मुखेड
शिव , फुले , शाहू आंबेडकराच्या पुरोगामी महाराष्ट्रात मागासवर्गीय युवकांवर अन्याय अत्याचार करुन खुन करणे हल्ले करणे अशा घटना काही थांबायला तयार नाहीत महाराष्ट्रात स्वतः ला पुरोगामी समजविणार्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे . पण सरकार मागासवर्गीया वरील हल्ले रोखण्यासाठी अपयशी ठरले आहे .पुणे जिल्हयातील विराज जगताप ऑनर किलिंग नागपूर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ता अरविंद बनसोड यांची हत्या व काही आठवड्यापूर्वी बीड जिल्हयात आदिवासी समाजातील एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आसुन या निवेदनाची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रतील अल्पसंख्यांक , मागास वर्गीय , वंचित समूहाच्या युवकांच्या खुन हत्या अन्याय आत्याचार करणार्यां आरोपींवर अँट्रासीटी अँक्ट व खुनाचे खटले भरून त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा व तमाम मागासवर्गीय समाज बांधवांना न्याय द्यावे अन्यथा युवा पँथरच्या वतीने महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा पँथर या सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे निवेदनादारे केली आहे . यावेळी , सुशिलकुमार जोंधळे , अनिल हसनाळकर श्रीकुमार के कांबळे बावलगावकर , सुहास पाळेकर , अशिष वाघमारे , सुनील शिकारे , बंटी भद्रे शिरुरकर आदी युवा पँथरचे कार्यकर्ते उपस्थित होते

Comments
Post a Comment