शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या : मन्मथ खंकरे
मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद
मुखेड तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी मागील दिवसात सोयाबीन तूर , मूग , उडीद , कापूस या पिकांची हजारो हेक्टर वर पेरणी केली असता अनेकांच्या शेतात बोगस बियाणेमुळे सोयाबीन उगवलाच नाही . संदर्भात शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारा खर्च द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे . गेल्या चार वर्षापासुन निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळेवर पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते सतत चार वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच तालुक्यात दमदार पाऊस झाला चार ते पाच मोठे पाऊस झाले तालुक्यातील सातही मंडळात १०० मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर
पावसाची तालुक्याची सरासरी १३३ मीमी च्या वर आहे तर तालुक्यातील बाहाळी व मुक्रमाबाद मंडळात जवळपास १५० ते २०० मी मी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पेरण्या उरकल्या तालुक्यात ८० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या मात्र पेरणीच्या आठ दिवसानंतर सोयाबिन सोडले तर सर्वच प्रकारच्या बियाणाची उगवण झाली मात्र नामांकित कंपन्याचे सोयाबिनचे बियाणे मात्र उगवलेच नाही .शेतकऱ्यांनी कोरोनाच्या संकटातुन बाहेर पडून मोठया कष्ठाने बि - बियाणे , खते खरेदी करून पेरण्या केल्या होत्या एक बॅग सोयाबीन पेरण्यासाठी दहा ते पंधरा हजार रु खर्च होतो मात्र थोड्याशा पैशाच्या हव्यासापोटी कंपन्या व व्यापारी कृषी विभागाला हाताशी धरून बाजारात बोगस बियाणाची विक्री करून शेतकऱ्यांना फसवण्याचा गोरख धंदा सुरु केला त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना लाखो हेक्टरवर पून्हा दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे .
Comments
Post a Comment