SFI,DYFI च्यावतीने अंबुलगा येथे राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या विरोधात निषेध करण्यात आला!
SFI,DYFI च्यावतीने अंबुलगा येथे राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या विरोधात निषेध करण्यात आला!
यावेळी SFI चे माजी नेते कॉम्रेड अंकूश अंबुलगेकर व DYFI चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सुधाकर अंबुलगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संग्राम सोनकांबळे,शंकर बादावाड,अंबादास अंबुलगेकर,नरसिंग सोनकांबळे,शिवकुमार कांबळे,लालू सोनकांबळे,ज्ञानेश्वर कांबळे,रूपेश सोनकांबळे,संदिप गायकवाड आदी सहभागी होते
मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद
पुणे जिल्ह्यातील विराज जगतापची ऑनर किलिंग, नागपूर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरविंद
बनसोडे यांची हत्या व काही आठवड्यापूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालूक्यात मांगवडगाव येथील एकाच आदिवासी कुटुंबातील तिघांची हत्या या व अशा इतर सर्व प्रकरणांची कायदेशीर चौकशी करून ते विशेष न्यायालयात चालवली जाऊन संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारावाई करण्यात यावी.तसेच कायद्यातील तरतुदींनुसार अत्याचारग्रस्त सर्व कुटुंबांना आर्थिक साहाय्य व अन्य मदत करण्यात यावी.त्याचबरोबर राज्यात वाढत चाललेल्या जातीय अत्याचाराला रोखण्यासाठी योग्य अशा कठोर उपाय योजना करण्यात यावे,आदी मागण्यांना घेऊन एसएफआयने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील अंबूलगा(बू.) येथे राज्यात वाढत चाललेल्या दलित -आदिवासींवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात SFI चे माजी राज्य सचिव कॉम्रेड विनोद गोविंदवार यांनी महाराष्ट्रातील जातीय अत्याचाराची पार्श्वभूमी सांगत या विरोधात समाजातील सर्व घटकांनी एकजूटीने रस्त्यावर उतरले पाहिजे,व युवकांनी मोठ्या संख्येने अशा कृती आंदोलनात गावागावात पुढाकार घ्यावा असे सर्वांना आवाहन केले.यावेळी SFI चे माजी नेते कॉम्रेड अंकूश अंबुलगेकर व DYFI चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सुधाकर अंबुलगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संग्राम सोनकांबळे,शंकर बादावाड,अंबादास अंबुलगेकर,नरसिंग सोनकांबळे,शिवकुमार कांबळे,लालू सोनकांबळे,ज्ञानेश्वर कांबळे,रूपेश सोनकांबळे,संदिप गायकवाड आदी सहभागी होते

Comments
Post a Comment