घरी रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा वाढदिवसा निमित्य मुखेडच्या जनतेला केले आव्हान :-एस के बबलु
घरी रहा सुरक्षित रहा Dr APJ अब्दुल कलाम समाज सेवा समितिचे अध्यक्ष एस के बबलु भाई यांनी आपल्या वाढदिवसा निमित्य मुखेडच्या जनतेला केले आव्हान
मुखेड तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे
धडाडीचे कार्यकर्ते बबलु भाई सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व धर्माच्या लोकांना घेऊन कार्य करत असतात आज यांच्या वाढदिवस निमित्य आपल्या मित्र परिवारांना विनंती केली की जास्त जलोष मुद्दे न करता फक्त फोन द्वारे, सोशलमीडिया मार्फत मला शुभेच्छा दिले तरी ही मी सतत आपला ऋणी राहील केक,फुल,शाल काही हीं आनु नये असे त्यांनी सोशलमीडियामार्फत मित्र परिवारांना विनंती केली आहे.
घरी रहा सुरक्षित रहा
देशभरातील परिस्थिती एवढी चांगली नाहीये आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती नक्कीच गंभीर झाली आहे.पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक , अंगणवाडी सेविका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, पत्रकार बांधव आपल्या जीवाशी खेळून देशासाठी लढत आहेत, होय लढत आहेत तेही कोरोनारुपी अदृश्य शत्रूसोबत..........
आणि आपल्यापैकी बरेच जण काय करतोय तर यांच्या मेहनतीवर पाणी फेकणे हो तेच करतोय आपणआहो ही सर्व देशसेवक मंडळी आप-आपल्या जवाबदाऱ्या पार पाडत आहेत त्यांनाही कुटुंब आहेत याची जाणीव असावी.
पेशंट बरे होण्याचं प्रमाण भरपूर आहे पण आपल्यातील काही मंडळींच्या मुर्खपणामुळे किव्वा अतिशहांणपणामुळे नवीन कोरोना रुगणाची संख्या वाढत आहेत
या सर्व मंडळींच्या मेहनतीला साथ देऊया आपल्या प्रशासनाला साथ देऊया आणि कोरोना मुक्त भारताच्या दृष्टीने वाटचाल करूया ........! घरी रहा सुरक्षित रहा

Happy birthday 🎂🎂🎂
ReplyDelete