नांदेड पुन्हा सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव तर 5 रुग्ण हे मुखेड येथील रुग्णाची एकूण संख्या 262



कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये पाच 5 रुग्ण हे मुखेड तर एक रुग्ण हा नांदेड शहरातील आहे.

 
प्रतिनिधी बल्खी आसद

नांदेड :- रविवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार 6 अहवाल प्राप्त झाले आहेत यामुळे नांदेड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 262 वर पोहोचली आहे. आज प्राप्त अहवालानुसार एकाच कुटुंबातील 3 तर 1 व्यापारी तर 1 राजकीय नेत्याचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शहरातील बरकतपुरा या भागातील 1 पुरुष (वय वर्ष 32) असून सध्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी, विठ्ठल मंदिर येथील या भागात आढळले आहेत. यामध्ये 3 पुरुष (वय वर्ष अनुक्रमे 62, 52 व 47) तर मुखेड शहरातील 2 महिला वय वर्ष 55 व 52 बाबन हे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदर रुग्णांची सध्या स्थितीत प्रकृती स्थिर आहे.

मुखेड मध्ये हे पाच व अगोदरचे 2 असे 7 जणांवर उपचार चालू असून या अगोदर 8 जणांना सुट्टी देण्यात आली आहे . तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 15 अशी झाली आहे .
नागरिकांना आवाहन:
  • * स्वतः ची व इतरांची काळजी घ्या.
  • * अत्यावश्यक कामाशिवाय  बाहेर निघू नका.
  • * मास्क वापरा आणि डोकेदेखील दुहेरी आवरणाच्या कापडाने झाकून ठेवा.
  • * सैनीटायझरचा वापर करा.
  • * वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा.
  • * १० वर्षाखालील मुले, ६० वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता आणि आजारग्रस्त व्यक्तींनी वैद्यकीय उपचाराच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये.
  • * दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटाचे अंतर राखावे.
  • * गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
  • * प्रवास शक्यतो टाळावा.
  • * प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अन्न, फळे व पेयाचे सेवन करावे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान