वसंतनगर येथील मुख्य लिपिक खा.खा. शेख सेवानिवृत्त

वसंतनगर येथील मुख्य लिपिक खा.खा. शेख सेवानिवृत्त


मुखेड:
सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंतनगर येथील मुख्य लिपिक खा.खा. शेख टेंबुर्णीकर हे दि. 30 जून रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.
      खा.खा. शेख यांचा जन्म 10 जून 1962 रोजी खाजामिया शेख यांच्या पोटी टेंभुर्णी तालुका नायगाव येथे गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण टेंभुर्णी येथे जि. प. प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक शिक्षण जनता हायस्कूल कौठा येथे झाले. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर कंधार येथील शिवाजी महाविद्यालयात पद्व्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. खा.खा. शेख यांनी विमुक्त जाती सेवा समिती वसंत नगर या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मरवाळी येथे 1984 रोजी कनिष्ठ लिपिक या पदापासून कार्यास प्रारंभ केला. त्यानंतर 1992 ला वरिष्ठ लिपिक म्हणून माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी येथे पदोन्नती मिळाली. त्यांचे उत्कृष्ठ कार्य पाहून 1996 रोजी सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंत नगर येथे मुख्य लिपिक म्हणून संस्थेंचे तत्कालीन सचिव स्व.आ. गोविंदराव राठोड यांनी बढती केली. आजपावेतो त्यांनी उत्तम पदभार सांभाळला आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष मुख्य लिपिक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर, विद्यानिकेतन कमळेवाडी, संत ज्ञानेश्वर विद्यालय, संत नामदेव महाराज विद्यालय दापका या शाळेच्या उभारणीत खा.खा.शेख यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. खा. खा. शेख यांचा अत्यंत अभ्यासू वरिष्ठ लिपिक म्हणून संस्थेंनी त्यांना अनेक वेळा गौरविले आहे. शेख सरांचा शेख शफी अहेमद हा मोठा मुलगा यशोदा रुग्णालय नवी दिल्ली येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतो तर दुसरा मुलगा जावेद शेख हा इंजिनियर आहे तिसरा मुलगा शेख मुजाहारे बारामती येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतो तर लहाना मुलगा शेख मसूद हा बीएससी ऍग्री उत्तीर्ण आहे. त्यांची कन्या शेख जवेरीया ही बीएससी द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून त्यांची पत्नी रुखीया बेगम यांचा खा.खा. शेख यांच्या प्रगतीत सिंहाचा वाटा राहिला आहे. सेवानिवृत्ती नंतरही विमुक्त जाती सेवा समिती या शिक्षण संस्थेचे सचिव गंगाधर राठोड यांनी दिलेले काम करण्यास मी तयार असल्याची भावना प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. त्यांचे सासरे डी.एम. पठाण, भाऊ मोहम्मद अली शेख, प्रा. इसाक शेख, बहीण मदारबी, रहेमतबी, इमामबी तसेच भाचा शेख फारुख व बिलोली येथील पत्रकार रियाज शेख यांच्यासमवेत त्यांनी कौटुंबिक सलोका राखला आहे.  गंगाधर पाटील जाधव, प्रा. शिवाजी गेडेवाड, मामा सूर्वे, दीपक शेठ मुक्कावार, बालाजी गुडमवार, बी. डी. पाटील, बाबू गंदपवाड, प्रा.जयपाल राठोड, मुख्याध्यापक एम.डी. सूर्यवंशी, जी.के. सर्कलवाड, विजय कुमार जाधव, दिनेश कुलकर्णी, बीअँडसी चे उत्तम कुलकर्णी, मोहम्मद चौधरी, हैरद परदेशी, नासरखाँ पठाण यांच्यासह असंख्य मित्रांशी मैत्रीचे संबंध जोपासत मी मार्गक्रमण केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वसंतनगर संकुलाच्या वतीने सोशल डिस्टंस पाळून सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड, सचिव गंगाधर राठोड, आ. डॉ. तुषार राठोड, जि.प. सदस्य संतोषभाऊ राठोड, प्राचार्य हरीदास राठोड, उपप्राचार्य अरुणकूमार थोरवे यांच्यासह शाखाप्रमुख उपस्थित रहाणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान