योगासन चॅम्पीयनशीप -2020 या स्पर्धेत श्रीशा मारकोळे भारतात दुसरी

योगासन चॅम्पीयनशीप -2020 या स्पर्धेत श्रीशा मारकोळे भारतात दुसरी 

मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद

नांदेड :- नुकतेच अमेठी युनिवरसीटी तथा आयुष मंत्रालय , व इंडियन फार्मसी असोसिएशन आणि इंटरनॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ ग्लोबल योगासन चॅम्पियनशिप - 2020 ' च्या ऑल इंडिया लेवल योगा स्पर्धेत कु . श्रीशा अविनाश मारकोळे हिने 13 ते 25 या वयोगटातून पहिल्या फेरीत घवघवीत यश संपादन केले .

कोरोनाच्याजागतीक संकटामुळे नुकतेच 20 जून रोजी अंतीम ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली . त्यात श्रीशा ने उत्कृष्ठ आसनांचे प्रदर्शन केले . या स्पर्धेचे ऑनलाईन निकाल जागतिक योगदिनाच्या दिवशी जाहिर करण्यात आले . त्यामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या श्रीशा मारकोळे हिने 13 ते 25 वर्ष वयोगटातून भारतातून व्दितीय क्रमांक पटकावला . या स्पर्धेसाठी तिला इंटर नॅशनल योगापटू श्रेयश मार्कण्डेय , नांदेड येथील योगेश कोरडेवार , तसेच रामन बैनवाड , प्रकाश इबितदार यांनी मार्गदर्शन केले .

यापूर्वी सुध्दा श्रीशाने जिल्हा स्तरीय , विभागीय व स्टेटलेवल योगासन स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक मिळवली आहेत . कुं . श्रीशा मारकोळे हिने संपादन केलेल्या घवघवीत यशाबद्दल ग्यानमाता विद्याविहार फादर शिजुमान , विष्णु शिंदे , श्वेता ठाकूर , फिर्लक्यू पिल्लाई , विनोद थॉमसन आदिनी अभिनंदन केले . तिचे फोन , मेसेज , वॉटसअपद्वारे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान