नांदेडमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; पहिल्यांदाच तब्बल 24 रुग्णांची भर तर मुखेड तालुक्यात भीतीचा वातावरण

नांदेडमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; पहिल्यांदाच तब्बल 24 रुग्णांची भर मुखेड तालुक्यात भीतीचा वातावरण 

एकाच दिवशी सर्वात जास्त रुग्णांची नोंद, बाधित रुग्ण संख्या 286 झाली तर  3 रुग्णांना सुट्टी
नांदेड दि 16 जून: नांदेडमध्ये कोरोना चा धुमाकूळ सुरूच असून मंगळवारी एकाच दिवशी 24 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. दररोज ही संख्या झपाट्याने वाढत असून ही संख्या 300 च्या जवळ येऊन ठेपली आहे. नांदेड जिल्ह्यातील मंगळवार दिनांक 16 जून 2020 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 3 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या रुग्णांची संख्या 180 एवढी झाली आहे. 

आज 16 जून रोजी प्राप्त झालेल्या एकूण 278 अहवाला पैकी 230 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले, व 24 अहवाल हे पॉझिटिव प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 286 एवढी झाली आहे. यामध्ये 14 पुरुष व 10 महिला रुग्णांचा समावेश आहे. 

सदरील सर्व रुग्ण हे खालील भागातील आहे : -

•  सोमेश कॉलनी 4 - 3 पुरुष रुग्ण,  
वय वर्ष अनुक्रमे : 22 41, 53 व 1 महिला रुग्ण वय - 23.
•  शिवविजय कॉलनी 4 - 1 पुरुष वय - 67,  तीन महिला रुग्ण वय वर्ष अनुक्रमे : 3, 37 व 61.
•  श्रीकृष्ण नगर  2- 1 पुरुष वय -  61 एक महिला - 29.
•  फरांदे नगर येथील 1 पुरुष वय - 55, 
•  एम.जी.एम परिसर -  1 पुरुष वय 30.
•  विशाल नगर - 1 पुरुष वय - 49.
•  बरकतपुरा - 1 पुरुष वय - 36.
•  परीमल नगर -  1 पुरुष वय -55
•  चिखलवाडी - 1 महिला वय - 52.
•  दिपनगर - 1 महिला वय -19 
व  तसेच
 • मुखेड 6- 3 पुरुष रुग्ण 
वय वर्ष अनुक्रमे : 11, 30, 55 व तीन  महिला रुग्ण वय वर्ष अनुक्रमे : 38, 50, 65.
•  सेलू जिल्हा परभणी - 1 पुरुष रुग्ण वय 38.
 अशा एकूण 24  रुग्णांचा समावेश आहे.
व या सध्यास्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

मंगळवारी सकाळी आणखी 18  रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 286 वर पोहोचली आहे.  त्यात नांदेडच्या वजिराबाद भागातील  20 बँक कर्मचाऱ्यांचे स्वॉब घेण्यात आले, त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील 12 पुरुष व महिलांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. व अन्य दोन रुग्ण हे शहराच्या अन्य रुग्णाच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे. इतर इतर रुग्ण हे नांदेड जिल्ह्याचे विविध भागातील असून सेलू जिल्‍हा परभणीच्या एका रुग्णावर नांदेडच्या  रुग्णालयात उपचार चालू आहेत.

आतापर्यंत 286 रुग्णांपैकी 180  रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 13 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 93 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. 
या रुग्णांमध्ये एक स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष  52 व 54 आहेत.  तर 5 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 16/06/2020 वेळ 05.00 PM

आत्तापर्यंत एकूण संशयित - 5324
एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4843
क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2732
अजून निरीक्षणाखाली असलेले - 288
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 142
•     घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4701
•    आज घेतलेले नमुने - 99
एकुण नमुने तपासणी- 5397
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 286
पैकी निगेटीव्ह - 4630
नमुने तपासणी अहवाल बाकी- 167
नाकारण्यात आलेले नमुने - 86
•     अनिर्णित अहवाल – 220
•     कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 180
कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 145464 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान