नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मुखेडच्या नऊ विध्यार्थ्यांची निवड...

 नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मुखेडच्या नऊ विध्यार्थ्यांची निवड...
मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद

★ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व...

जानेवारी २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मुखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . शंकरनगर येथील नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे . विशेष म्हणजे निवड झालेले सर्व नऊ ही विद्यार्थी ग्रामीण भागातील असुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.नांदेड जिल्हयातील ८० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात येते . यावर्षी तालुक्यातील एकूण १५२० विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी १४३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असुन त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे . प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांत कु.अनुष्का विठ्ठल धनगे जि.प.प्रा.शा.मंडलापूर , संचिता गजानन गाडले किसान विद्यालय , उमरदरी , ममता रमाकांत पाटील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल बाहाळी , विश्वदीप बाबुराव वाघमारे जि.प.प्रा.शा.जांभळी , पद्माकर अंकुश धोतरे कें.प्रा.शा.होनवडज , ज्ञानेश्वर नागनाथ कोटपलवाड ब्राईट स्टार इंग्लिश स्कुल उमरदरी , भागवत रामदास टेकाळे ब्रााईट स्टार इंग्लिश स्कुल उमरदरी , साईप्रसाद तानाजी कोलेवाड संत कैकाडी महाराज प्रा.शा.बाहाळी , समेक विनोद डुमणे जिवनदिप मॉडेल स्कुल काळुतांडा यांचा समावेश आहे . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राम भारती , विस्तार अधिकारी बी.एम.पाटील , मनीषा बडगिरे , शिवशंकर जंपलवाड , गजानन होनराव , संगणक विभाग प्रमुख शिवाजी कराळे , परीक्षा प्रमुख सायलू करेवाड , श्रीकांत

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान