अतिवृष्टी नुकसानीचे थकीत अनुदान बोगस बियाने विक्रेत्यास चौकशी व लॉकडाऊन काळातील विज बिल तात्काळ माफ करा:- राहुल गांधी विचार मंच बिलोली

प्रतिनिधि :- बल्खी आसद

बिलोली :- यंदा मौसमी पावसाला सगळीकडे दमदार सुरुवात झाली. पाऊस चांगला झाल्याने शेतकर्‍यांनी
मृगनक्षत्रात खरिपाची पेरणी केली. मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी करून लागवड केली. अशा अनेक शेतकर्‍यांचे बियाण उगवले नाही. अशा शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभा टाकले  बोगस बियाणे बाजारात आणून विक्री करणारे व्यापारी व संबंधित कंपनीवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह राहुल गांधी विचार मंच बिलोली यांच्या कडुन होत आहे.
विज वितरण कंपनी ने गेल्या दोन तिन दिवसापासुन शहराह तालुक्यातील मार्च महिन्या पासुन बंद आसलेल्या विज बिल देण्यास व वसुलीस सुरुवात केली खरी पण मार्च महिन्या पासूनची आजची जी मिटर रिडींग ग्राह्य धरत सरासरी ने मिटर रिडींग टाकून शहरासह तालुक्यातील असंख्य ग्राहकांना वाजविपेक्षा जास्त बिले दिली . व्यावसायिक ग्राहकांना तर आपले पूर्ण व्यवसाय बंद करून घरी बसले होते.त्यांना नियमित रिडींग नुप्सार विज बिल महिन्याला सरासरी ६०० रुपये येत होते . याप्रमाणे पाहिले तर मार्च एप्रिल मे या तिन महिन्याचे बिल १८०० रुपये यायला पाहिजे होते.परंतु आज तेच बिल ४५०० रु . ते ५००० रू.चिल आकारले आहे कारण गेली ३ महिने रिडींग न घेतल्याने दर महिन्याला रिडींग वाढत गेली त्यानुसार रिडींग ची किंमत वाढत । गेली . विज वितरण कंपनीने ३ महिणे म रिडींग घेतली नाही परिणामी कंपनीने न ग्राहकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.बिलोली तालुक्यातील ७० % ते ८०१८ ग्राहकांनी परी आँनलाईन बिले भरून सुद्धा चौपट बिले आले आहेत .
सर्व सामान्य लोकांनची काहीही चुक नसताना केवळ विज वितरण कंपनीच्या | चुकीच्या धोरणामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे . तालुक्यातील असंख्य ग्राहकांन विज वितरण कंपनीचे पहिले महिनेवारी सरासरी दर महिन्याला ४३० रु . ५४० रू . ६०० रू ७४० रू असे विजबिल भरणार्या ग्राहकांना ३००० रू.ते | ६००० भरावे लागतात.मार्च महिन्यामध्ये संपूर्ण भारतात लाँकडाऊन झाल्यामुळे सामान्य लोकांनच्या हाताला काम मिळाले नाही.त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे | मोडले आहे
सन २०१ ९ मधील सप्टेंबर , ऑक्टोबर मध्ये खरीप हंगामात अतिवृष्टी नुकसानीचे थकीत अनुदान तात्काळ शेतक - यांना वाटप करावे तसेच निराधारांचे , अपंगाचे अनुदान लॉकडाऊन काळातील वाढीव अनुदान ३ महिण्यांचे खात्यावर जमा करण्यात यावे . अशी मागणी मा.तहसिलदार साहेब यांना अजित अशोकराव पाटील तळणीकर,गोविंद मुदगुरे आळंदीकर,रानवळकर बालाजी संभाजी ,मौनोदील हुसेन शेख,सय्यद अहेमद इसाक,प्रदीप रानवळकर,गणेश काळेकर,सीराज शेख ( लोहगावकर )  शेतकर्‍यांसह राहुल गांधी विचार मंच बिलोली यांच्या कडुन करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान