सागरगड माची वासियांना आ. जयंत पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

सागरगड माची वासियांना आ. जयंत पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप


अलिबाग तालुक्यात 'निसर्ग' चक्रीवादळाने भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ग्रुप ग्रामपंचायत खंडाळा हद्दीतील सागरगड माची येथील अनेक घरांचे, समाजमंदिरांचे, अंगणवाडीचे पत्रे उडून जाऊन मोठे नुकसान झाले होते, आमदार जयंत पाटील यांनी पाहणी करून स्वखर्चातून लाखो रुपयांचे पत्रे दिले होते आणि आज त्यांच्या हस्ते सरकारी धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार सचिन सेजाळ, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, माजी जि. प. सदस्य संजय पाटील,  जि. प. सदस्या प्रियदर्शनी पाटील, उपसभापती मीनल माळी, ग्रामपंचायत चेंढरे माजी सदस्य अजित माळी, ग्रुप ग्रामपंचायत खंडाळेच्या सरपंच रंजना नाईक, उपसरपंच संतोष कनगुटकर, माजी सरपंच नासिकेत कावजी, विलास वालेकर, नरेश गोंधळी, विलास थळे व इतर शेकापचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान