सावरगाव (पीर ) येथील दोन दुकानाला भिषण आग
सावरगाव (पीर ) येथील दोन दुकानाला भिषण आग सावरगाव/प्रतिनिधी शेख चांदपाशा मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील दि.31मे रोजी सुमारे रात्री 8:00 वाजता अचानक मोबाइल व इलेक्ट्रॉनिक शॉप ला भीषण आग लागली असून ,आग पेट घेत जवळपास दोन दुकानाला आगीच्या पेटेत घेतले होते, गावकऱ्यांनी आग पाणी टाकून कसेबसे विजवले, आगीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नसून मोबाइल व इलेक्ट्रॉनिक शॉपितला माल जळून खाक झाला आहे, मोबाईल शॉप मालकाचे नाव शिवाजी जाधव यांची असून त्यांच्या दुकानातील कॉम्पुटर, प्रिंटर, मोबाईल असे अनेक वस्तू जळलेली आहे ,लगतच असलेल्या हॉटेल मधला फ्रीज, गॅस ला पेट घेऊन आगीचे प्रमाण वाढले, हॉटेल मालकाचे नाव गोविंद पलेवाड असून.पलीकडून वसीम जनरल स्टोर यांचे सुद्धा लुकसान झालेला आहे, सावरगाव येथे आग लागली कळताच मुखेडचे पोलीस निरीक्षक अंकुशकर साहेब तात्काळ घटनास्थळी पाहणी केली आहे, अग्नी शामक दलाची गाडी वेळेवर न पोहचल्याने गावकरी संताप व्यक्त करत आहेत ,आगीचे कारण अद्याप कळालेला नाही.