बेटमोगरा येथील त्या दोन कोरोना संशयीत रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बेटमोगरा येथील त्या दोन कोरोना संशयीत
रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बेटमोगरा प्रतिनिधी  / मुस्तफा पिंजारी

मुखेड तालुका हा डोंगराळ भाग असुन येथील बहुतांश नागरिक आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरी भागात स्थलांतर करतात मात्र निसर्गाच्या संकट मानवजातीवर हल्ला केल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सरकारने २२ मार्च पासून देशात लॉकडाऊन घोषित केले असुन ग्रामिण भागातील बहुतांश लोक पुणे, मुंबई, हैदराबाद सारख्या शहरात लॉकडाऊन मुळे आडकले होते.त्यांना परत आपआपल्या गावात आणण्यासाठी शासनाने उपाययोजना कल्याने बेटमोगरा परिसरातील बहुतांश नागरिकांची घरवापसी झाल्याने मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.१६ मे रोजी येथील २ संशयित रुग्ण आढळले होते हे दोघेही पुणे येथून आल्याचे समजते तसेच यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता त्यांना ताप,खोकला, श्वास घेण्यास त्रास असे लक्षणे आढळल्याने त्यांना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.
त्यांच्यावर मुखेड येथील कोरोना सेंटर मध्ये उपचार करण्यात आला असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे आणि त्या दोन्ही रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने तालुक्यातील बेटमोगरा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून जनतेनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
परराज्यातून तसेच मुंबई,पुणे, औरंगाबाद,नाशिक आदीसह इतर बाधित जिल्ह्यातून त्यांच्या गावी परतण्यासाठी अडकलेल्या लोकांना शासनाकडून काही अटीवर परवानगी देण्यात आली असल्याने त्यानुसार तालुक्यातील अनेक गावासह बेटमोगरा येथे देखील अनेक विद्यार्थी,कामगारांची घरवापसी झाली आहे. त्याचेच पडसाद
बेटमोगरा येथे कोरोना संसर्गाचे २ संशयीत रुग्ण आढल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान