लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने चालविण्यात येणारा 'लॉयन्सचा डबा' हा उपक्रम रयत रुग्णालय सोबतच श्री गुरुजी रुग्णालयात आज पासून सुरुवात
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने श्री गुरुजी रुग्णालय येथे लॉयन्सचा डबा सुरू करण्यात आला असून लॉयन्सच्या डब्यामुळे रुग्णसेवेचा अनोखा पायंडा नांदेड मध्ये पडला आहे अश्या शब्दात भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी कौतुक केले.
प्रतिनिधि:- बल्खी आसद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले, लॉयन्स उप प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या हस्ते रुग्णांना डबे वितरित करण्यात आले. सेन्ट्रल अध्यक्ष लॉ.डॉ.विजय भारतीया,उपाध्यक्ष लॉ.संजय अग्रवाल यांनी प्रमुख अतिथींचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत केले.प्रोजेक्ट चेअरमन लॉ.अॅड. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविक करतांना असे सांगितले की,रयत रुग्णालया सोबतच आजपासून श्री गुरुजी रुग्णालयातील सर्व रुग्णांना दररोज पाच चपाती, भाजी,वरण-भात चा डब्यामध्ये समावेश असणार आहे. ज्यांच्या वतीने डबा देण्यात येणार असेल त्याचे नाव असणारे कार्ड डब्या सोबत रुग्णाना देण्यात येणार आहे. अन्नदात्यांच्या हस्ते डबे देवून समाज माध्यमात प्रसिद्धी देण्यात येईल.दोन वर्षभर कोणत्या दिवशी कोण डबे देणार आहेत त्याचा फलक श्री गुरुजी रुग्णालयात लावण्यात येणार आहे. एखाद्या शुभ प्रसंगी अथवा आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिल्या वर्षी वीस आणि दुसऱ्या वर्षी वीस असे एकूण चाळीस डबे देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी रुपये दोन हजार भरून आपला दिवस राखीव करावा .
फार कमी तारखा शिल्लक असल्यामुळे इच्छुकानी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन ठाकूर यांनी केले.लॉ. संजय अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गुरुजी रुग्णालय येथे तर अनिता व अनिल चिद्रावार यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रयत रुग्णालय येथे डबे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित श्री गुरुजी रुग्णालयात अत्यल्प दरात वैद्यकीय सुविधा देण्यात येते. त्यामुळे अनेक गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल होतात.त्यामुळे या रुग्णालयात डब्याचे वितरण करण्याचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी वक्त केली.दोन वर्षातील मोजक्याच तारखा शिल्लक असल्यामुळे इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे

Comments
Post a Comment