नांदेड व मुखेड येथे आणखी ६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले; रुग्णांची संख्या झाली १२५

नांदेड व मुखेड येथे आणखी ६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले; रुग्णांची संख्या झाली १२५
मुखेेेड/प्रतिनिधि:- बल्खी आसद
दोन युवक व एका चिमुकलीचा समावेश, मुखेडलाही आणखी दोन रूग्ण; दिवसभरात नऊ रूग्ण वाढले.                                
                                                                                    नांदेड दि.23मे: आज रोजी प्राप्त झालेल्या एकूण नमुन्यांच्या १३५ अहवालां पैकी१२० निगेटिव अहवाल प्राप्त झाले व नवीन ०६ रुग्णांचे  नमुने Corona Positive अहवाल आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या १२५ झाली आहे.

आता प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी कुंभार टेकडी २ रूग्ण (१ पुरुष (वय १५), १ महिला(वय २८)/ सकाळी येथील ३ रूग्ण पॉझिटिव्ह होते. करबला नगर २ रूग्ण ( १ पुरुष (वय ३८), १ महिला- वय ६) व उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील  २ रूग्ण (१ पुरुष (वय३४), १ महिला- वय २२) या भागातील असुन सर्व रुग्णांना औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थितीत स्थिर आहे.

आज दिनांक 23 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय बारड येथील कोवीड केअर सेंटर येथील १ रुग्ण व डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील २ रुग्ण असे एकूण ३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत १२५ पॉझिटिव रुग्णांपैकी ५५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व उर्वरित ६२ रुग्णांवर औषध उपचार सुरू आहेत.

एकुण १२५ रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ५५ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचे ६२ रुग्णांपैकी ०६ रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ४९ रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ५ रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थिर आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.