नांदेडमध्ये 3 नवे पॉझिटिव्ह रुग्ण तर 26 रुग्ण कोरोना आजारातून मुक्त बाधित संख्या 66


प्रतिनिधि :-

नांदेड :-  आज प्राप्त एकूण 126 अहवालानुसार यात्री निवास कोविड केअर सेंटर येथील तीन रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यांची प्रकृती सध्यास्थितीत स्थिर आहे. तसेच 121 अहवाल हे निगेटिव प्राप्त झाले असून, 2 स्वॅब तपासणीचा अहवाल नाकारण्यात आलेला आहे.

शहरातील विविध भागात व गुरुद्वारा परिसरातील 66 रुग्ण हे कोरोना आजाराने बाधित होते. या सर्वांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व यात्री निवास कोविड नियंत्रण कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आलेले होते. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाने योग्य उपचार केल्यामुळे आज रोजी यात्री निवास येतील 22 व डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 3 रुग्ण कोरोना आजारातून मुक्त झाले आहेत. या आदी अबचलनगर येथील पहिला रुग्ण असे आजपर्यंत 26 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे.

सात दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार. बुधवारी सायंकाळी एका वाहन चालकाला डिस्चार्ज दिला होता आज गुरुवारी पंजाब भवन मधील २२ रुग्णांना सुट्टी दिल्यानंतर महापालिकेचे पथक दररोज तीन वेळा संपर्क करणार आहे. सदर रुग्णास त्रास झाला, लक्षणे दिसली की पुन्हा रुग्णालयात दाखल करणार आहेत.  सात दिवसाच्या विलगीकरणानंतर बाधितांना फिरण्याची मोकळीक मिळणार आहे.

उर्वरित पॉझिटिव रुग्णांपैकी 8 रुग्णांवर डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे 1 रुग्णावर उपचार सुरू आहेत. तसेच पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे असलेल्या 24 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजतागायत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 105942 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकूण 2302 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1999 स्वॅब  तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून, 200 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. सदर घेतलेल्या एकूण स्वॅब पैकी 66 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह 5 मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
 कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान