नांदेड आणखी 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले; रुग्ण संख्या झाली १२७
शिवाजीनगर व विवेकनगर भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
सापडले; रुग्ण संख्या झाली १२७
नांदेड :- आज दि 24 मे रोजी प्राप्त झालेल्या एकूण 2 अहवाल पैकी नवीन 2 रुग्णांचे स्वॅब हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्या 127 झाली आहे.
आता प्राप्त झालेल्या 2 पॉझिटिव रुग्णांपैकी शिवाजीनगर येथील 1 रुग्ण व विवेक नगर येथील 1 रुग्ण ( दोन पुरुष वय 61, 40) या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थितीत स्थिर आहे.
एकूण 127 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 55 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. 62 रुग्णांपैकी 7 रुग्ण हे डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन कोविड केअर सेंटर यात्रीनिवास कोविड केअर सेंटर येथे 47 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5 व ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण असून व 1 रुग्ण नांदेड येथील खाजगी रुग्णालय येथे सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments
Post a Comment