नांदेड आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्ण वाढले एकाचा मृत्यू! नांदेडच्या गाडीपुरा, मुखेड व बिलोलीतही कोरोनाचा शिरकाव संख्या 116

नांदेड आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्ण वाढले एकाचा मृत्यू!
नांदेडच्या गाडीपुरा, मुखेड व बिलोलीतही कोरोनाचा शिरकाव संख्या 116

मुखेड तालुक्यात मध्ये 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने भीतिचा वातावरण

नांदेड:-  आज रोजी प्राप्त नमुन्यांच्या अहवालां पैकी ०६ नमुने कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे. त्यापैकी  २ रुग्ण गाडीपुरा या भागातील असुन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे, ०१ रुग्ण यात्री निवास, नांदेड येथे दाखल आहे , ०२ रावण कुळा , तालुका मुखेड, येथील रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहेत व ०१ केरुर, तालुका बिलोली येथील रहिवासी असून तो बीलोली येथील CCC मध्ये  दाखल आहे.


गाडीपुरा भागात कोरोनाचे दोन रुग्ण सापडले असून त्यापैकी एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.यामुळे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गाडीपुरा भागातही कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान आता गाडीपुरा भागाचाही प्रतिबंधित क्षेत्रात समावेश होणार असून या भागातील प्रत्येकांनी काळजी घेण्याची गरज आहे.


तसेच 1 केरुर, तालुका बिलोली येथील रहिवासी असून तो बीलोली येथील कोवीड केअर सेंटरमध्ये  दाखल आहे.

ही प्राथमिक माहिती असून, याबाबतची अधिकृत व अधिकची  माहिती थोड्या वेळात देण्यात येईल......

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान