कोरोनाच ग्रामीण भागात होतोय शिरकाव मुखेड तालुक्यात रुग्ण वाढले , आज 2 पॉझिटिव्ह संख्या 5 वर
कोरोनाच ग्रामीण भागात होतोय शिरकाव मुखेड तालुक्यात रुग्ण वाढले , आज 2 पॉझिटिव्ह संख्या 5 वर
मुखेड /प्रतिनिधि बल्खी आसद
नांदेडात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा कहर चिंता वाढवत आहे . मुखेड तालुक्यात त्याचा शिरकाव झाला असून तालुक्यात आज दोन नवीन रुग्णांची नोंद झाली तर यापूर्वी असणारे 3 आणि आज वाढलेले 2 अशी एकूण रुग्णसंख्या मुखेड तालुक्यात ५ एवढी झाली आहे . मुळात या सर्व रुग्ण यांची पार्श्वभूमि पाहिली तर त्यांचे थेट मुंबई किंवा पुणे कनेक्शन समोर येत आहे . केवळ स्थलांतरित लोकांमुळे मुखेड तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.यामुळे प्रशासन खबरदारीचे सर्व उपाय करत असल्याचे दिसून येत आहे .
आज प्राप्त अहवालानुसार 30 पैकी 28 अहवाल निगेटिव्ह तर 2 पॉझिटिव्ह आढळले आहेत. सदर दोन्ही रुग्ण मुखेड तालुक्यातील भेंडेगाव या गावचे रहिवासी आहेत. यामुळे मुखेड तालुक्यात बाधितांची संख्या ५ वर पोहोचली आहे. गंभीर रुग्णांची संख्या ४ झाली असून, दोन महिला (वय ५२, ५५) दोन पुरुष (वय ३८, ८०) दोन्ही रुग्ण हे खाजगी बसने मुंबईहून मुखेड तालुक्यात आले होते. त्यांचा लातूरच्या बाधित व्यक्तीची संपर्क झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही रुग्ण हे तरुण आहेत एकाचे वय 27 तर दुसऱ्याचे वय 32 आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक रूग्ण मुखेडमध्ये, डॉक्टर (१), नर्स(१), रावनकोळा (२), भेंडेगाव (२), टेंभुर्णी, ता. नायगाव (१). मुखेड मयत महिला (१) आजचे 30 पैकी 28 अहवाल निगेटिव्ह तर 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाधीत व्यक्तींची संख्या 146 वर पोहचली आहे.
आतापर्यंत 103 रुग्ण आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 35 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Comments
Post a Comment