नांदेडमध्ये कोरोनाचे शतक; आठ नवे रुग्ण सापडले, संख्या १०६ वर
नांदेड :- नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी व रात्री १०.३० वाजता मिळून एकूण १६१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८ पॉझिटिव्ह तर १४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. ९ अहवाल अनिर्णीत आहेत. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून ही संख्या १०६ झाली आहे.
नांदेड मध्ये कोरोनाने शतक पुर्ण केले आसून बाधीतांची संख्या १०६ वर गेली आहे. या पैकी ५ जनांचा मृत्यू झाला आसून ३० जन बरे झाले आहेत. २ फरार आसून इतरांवर उपचार सुरु आहे.
मंगळवारी आढळलेले बाधित रूग्ण
- कुंभार टेकडी रूग्ण संपर्कातील ६ जण बाधित
- करबला मयत रूग्ण संपर्कातील दोन जण
- अबचल नगर रूग्ण संपर्कातील एक जण
असे नऊ जण पॉझिटिव्ह असल्याचे समजते. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप”डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments
Post a Comment