नांदेडला शनिवारी आणखी १८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले!

 प्रतिनिधि :- बल्खी आसद

 – बाधितांची संख्या ८४ वर पोहचली 
– २६ जणांना दिला डिस्चार्ज
 – पाच जणांचा मृत्यू, दोघे फरार 
– ५१ रुग्णांवर उपचार सुरू


नांदेड :- 14 मे २०२० रोजी तपासणी साठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी १८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे.
त्यापैकी  13 रुग्ण प्रवासी आहेत, 4 रुग्ण करबला भागातील आहेत व 1 रुग्ण सराफा, कुंभार गल्ली, नांदेड येथील रहिवासी असून तो शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल आहे

दोन दिवसांपूर्वी तपासणसाठी पाठविण्यात आलेले अहवाल शनिवार दि. 16 मे रोजी प्राप्त झाले आहेत. यामध्ये नव्याने 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 13 जण प्रवासी, चार जण करबला नगर व एक जण सराफा भागातील रहिवासी आहे.

मागच्या दोन दिवसांपासून अहवाल प्रलंबित होते. प्रयोग शाळेत काही तांत्रिक अडचण असल्याने दि. 15 मे रोजी अहवाल येऊ शकले नव्हते. सदरचे अहवाल शनिवारी सकाळी धडकले. यात 18 जणांना कोरेानाची लागण झाल्याने नांदेडकरांना पुन्हा जोर का झटका बसला आहे.

आठरा जणांमध्ये 13 जण हे परराज्यातील असल्याचा अंदाज असून काही दिवसांपूर्वी करबला नगर येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. त्याच भागातील चार जणांना कोरोनाची लागण झाली, तर सराफा भागात ही नव्याने रुग्ण आढळून आल्याने सराफा परिसरातही सकाळी-सकाळी मोठी खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी कोरोनाचे लक्षणे न  आढळून आल्याने 26 जणांना  कोविड केअर सेंटरकडून डिस्चार्ज देण्यात आला होता. जिल्ह्यासाठी दिलासा बाब काही औटघटकेची ठरली, असून पुन्हा नवे आठरा रुग्ण सापडल्याने नांदेडमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 84 इतकी झाली. यात 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच जणांचा यापूर्वी मृत्यू झाला, तर दोन कोरोनाग्रस्तांचा तपास अद्याप लागू शकला नाही. त्यामुळे उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या आता 51 वर आली आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान