अखेर मठाधिपती हत्याप्रकरणी आरोपीला तेलंगणातून अटक

आरोपी साईनाथ हा उमरी येथील राहाणारा असून तो सराईत गुन्हेगार आहे.
                                                      नांदेड:- संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील नागठाणा मठाधिपती हत्या प्रकरणातील फरार आरोपीच्या पोलिसांनी 24 तासांच्या आत मुसक्य आवळल्या आहेत. आरोपी साईनाथ लिंगाडे याला पोलिसांनी तेलंगणा राज्यातून अटक केली.

आरोपीची चौकशी सुरू असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी साईनाथ हा उमरी येथील राहाणारा असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या आणि छेडछाडीचे गुन्हे आहेत. चोरीच्या हेतूने त्याने नागाठाणा बु.चे मठाधिपती बालतपस्वी निर्वाण मठाचे मठापती रुद्र पशुपतीनाथ महाराज यांची गळा आवळून हत्या केली. साधू महाराज यांच्यासह आरोपींने स्वतःच्या मित्र भगवान शिंदे याचीही हत्या केल्याची कबुली आरोपी साईनाथ लिंगाडे याने दिली आहे.

उमरी तालुक्यातील नागठाणा मठाचे मठाधिपती बालतपस्वी निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. याशिवाय मठातील एका सेवेकरीचीही हत्या करण्यात आली. मठातील शौचालयाजवळ सेवेकरीचा मृतदेह सापडला आहे.

नागठाणा गावातील आरोपी साईनाथ लिंगाडे या तरुणाने महाराजांची हत्या केल्याचे आता स्पष्ट झालं आहे. आरोपीने मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला. नंतर महाराजांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. एवढंच नाही तर महाराजांची गाडीतून पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर महाराजांचा मृतदेहही पळवून नेण्याचा त्याचा इरादा होता. मात्र, मठाशेजारी राहाणारे लोक जागे झाल्याचं पाहताच आरोपीने गाडी तिथेच सोडून पळ काढला होता. गाडीत बालतपस्वी निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा मृतदेह आढळून आला होता. शिवाचार्य महाराज हे मूळ कर्नाटकातील रहिवाशी होते.

नागठाणा मठातील शौचालयात सापडलेला मृतदेह चिंचाळा गावातील भगवान शिंदे यांचा आहे. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते, असं सांगितलं जात आहे. भगवान शिंदे हे आपले मित्र असल्याचं आरोपीनं पोलिस चौकशीत म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.


दरम्यान, महाराज आणि भगवान शिंदे यांचा मतृदेह उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा भाविकांनी घेतला होता. महाराजांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला की आणखी काही कारण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.  या घटनेमुळे उमरी तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान