बेटमोगरा येथील दिव्यांगाना आधार म्हणून रामदास पा.सुमठाणकर मित्र परिवारानी दिला मदतीचा हात
रामदास पा.सुमठाणकर व मित्र परिवाराचे कौतुकास्पद कार्यसंपूर्ण मुखेड तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
मुखेड /प्रतिनिधि :- बल्खी आसद
देशात कोरोना हा महाभयंकर आजाराने थैमान घातले असून देशासह राज्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढतच असल्याने या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन 31 मे पर्यन्त वाढ करण्यात आली असुन गोर गरीब जनतेला उपासमारीची वेळ आली आहे.
मुखेड तालुका हा डोंगराळ भाग असुन बेटमोगरा परिसर सारख्या ग्रामिण भागातील बहुतांश लोकांना मोलमजुरी शिवाय दुसरा पर्याय नसतो,त्यांचे हातावर पोट असल्याने ते छोटे मोठे व्यवसाय करुन आपल्या कुटुंबांचे उदरनिर्वाह चालवत असतात मात्र देशात तब्बल दिड महिण्यापासुन लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचे तर हाल होत आहे.मात्र या लॉकडाऊन व संचारबंदी मुळे दिव्यांग व्यक्तीचीं अधिकच अडचण निर्माण झाली आहे.अशा व्यक्तींना एक मदतीचा हात म्हणून रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या वतीने बेटमोगरा परिसरातील सलगरा बु, सलगरा खु , चांडोळासह बेटमोगरा येथील दिव्यांग व मुकबधीर गरजुंना जिवनावश्यक वस्तुंचे ३५ किट वाटप करण्यात आले. यावेळी प्रा.विनोद आडेपवार,आर्चना ताई बियाणी, सचिन इंगोले, नितीन टोकलवाड, महेश पाटील,योगेश पाळेकर,चंद्रकांत वडजे, लक्षमण पिटलेवाड बेटमोगरेकर,विरभद्र स्वामी,शंकर पाटील ,गजानन कापसे, राहूल कंदमवार आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment