आपल्या घरी दिवे लावून शंभूराजे दिपोत्सव जयंती साजरी करावी :- संतोष पा इंगोले

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती घरीच साजरी करावी:- संतोष पा इंगोले



मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद

ज्यांच्या पराक्रमालाच नव्हे तर बलिदान देखील जगाच्या इतिहात तोड नाही ते म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज.
महाराष्ट्रातील तमाम शिव-शंभु भक्त आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होते. तो क्षण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे.

राष्ट्रवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (१४मे) सालान बाद मोठ्या प्रमाणत साजरी होऊ शकत नाही. कारण आज देशावर कोरोना सारखा बलाढ्य शत्रू आक्रमण करत आहे, दिवसें दिवस झपाट्याने कोरोना रुग्णत वाढ होत आहे. राष्ट्र देशाच्या हिता साठी शासनाच्या नियमांचे पालन करून, यंदाचा शंभुजन्मोत्सव सोहळा घरीच शंभूराजे दिपोत्सव साजरा करूया.


संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे, शंभुचरित्र वाचावे, त्यांचे विचार आत्मसात करावे, अवघ्या ३२ वर्षात त्यांनी केलेले कार्य कर्तृत्व धर्मकारण राजकारण समाजकारण न्याय व्यवस्था, शासन प्रशासन शेतकऱ्यां विषयी दृष्टिकोन, स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य, साहित्यिक, युद्ध अश्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहून गौरशाली इतिहास सोशल मीडिया वर प्रसारित करावे व त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकून खऱ्या अर्थाने मान वंदना देऊया ह्या लॉकडाउन च्या काळात महापुरुषांच्या जयंत्या नाचून नही तर वाचून साजऱ्या कराव्या

सर्व छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुयायांनी या जयंतीनिमित्त त्यांचे जीवन चरित्र अभ्यासू व राञी 8:30  वाजता आपल्या घरी दिवे लावून शंभूराजे दिपोत्सव साजरा करावा असे  आव्हान संभाजी ब्रिगेडचे संतोष पा इंगोले यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान