नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुकांतर्गत हद्दी कडेकोट सिल करुन तालुकांतर्गत सर्व व्यवहार सुरु करा माधव साठे यांनी जिल्हाधिकारीना पत्राद्वारे केली विनंती

नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुकांतर्गत हद्दी कडेकोट सिल करुन तालुकांतर्गत सर्व व्यवहार सुरु करा माधव साठे  यांनी जिल्हाधिकारी साहेबांना पत्राद्वारे केली विनंती  

मुखेड /प्रतिनिधि  बल्खी आसद


संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. यामहारोगावर विजय मिळविण्यासाठी संपूर्ण देश लाॅक डाऊनच्या माध्यमातून एकजुटीने लढा देत आहे.
 नांदेड शहरात,ग्रामीण भागात कोरोनाबाधीत व्यक्ती सापडत आहेत . परंतु ग्रामीण भागात ज्या - ज्या तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्ण सापडत नाहीत अशा तालुक्यातील व्यवहार नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात मागील 22 मार्च पासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यावहार बंद आहेत . शासनाच्या व आपल्या सुचनेप्रमाणे ग्रामीण भागातील सर्व व्यावसाईकाची लॉकडाऊनमुळे आर्थिक , मानसिक , शारिरीक अशा अनेक संकटावर मात करीत देशासाठी जनतेनी प्रामाणीकपणे लॉकडाकनचे पालन केले . आता ह्या झळा सोसत नाहीत . रोजगार , शेतमजूर , छोटे - छोटे व्यापारी , बारा - बलुतेदार , छोट्या व्यावसाईकावर व रोजंदारीवर अवलंबून असणाऱ्याची संख्या फार आहे . तब्बल पावने दोन महिण्याच्या लॉकडाऊन पाळल्यावर आता त्यांना फार कठीण जात आहे व त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे . यामुळे तालुक्याच्या सिमा कडेकोट बंद करुन तालुकांतर्गत व्यावहार पूर्णपणे सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे . जेनेकरुन गवंडी बांधकामाच्या कामावर जाईल , रोजंदार रोजंदारीवर जाईल , सुतार , लोहार , सोनार , चांभार , टपरीवाले हे आपआपले व्यावहार सोशल डिस्टन्स ठेवून चालू करतील . केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व सुचनाचे ततोतंत पालन करुन व्यावहार खुले करण्यात यावेत . यामुळे शासनावरील भारदेखील कमी होईल . त्याअनुषंगाने आपण सर्व संबंधित अधिकाऱ्याला सुचित करुन मुखेड तालुक्यासह अन्य तालुक्यातील व सर्व प्रकारचे व्यावहार तालुका सिमा कडेकोट बंद करुन तालुकांतर्गत सर्व व्यावहार खुले करावे  साहेबांनी निवेदनाची दखल घेवून तात्काळ उपाययोजना करावे ही विनंती . भाजपा जिल्हा महामंत्री माधव साठे  यांनी केली

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान