नांदेड आणखी 4 पॉझिटिव्ह; भोकर, मुखेड येथे कोरोनाचा प्रवेश, रुग्णांची संख्या ११०

 नांदेड शहरातील श्रेय नगर व सांगवीचा प्रत्येकी एक रूग्ण, आणखी तीन कंटेंट मेंट झोन वाढणार!
                                     मुखेड/प्रतिनिधि बल्खी आसद                                                                    
नांदेड :-  आता प्राप्त झालेले एकूण 13 अहवाल पैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही 110 वर पोहोचली आहे. उर्वरित आज पाठवण्यात आलेले 31 नवीन व्यक्तींचे स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आले आहे व 33 स्वॅब प्रलंबित असे एकूण 64 स्वॅबची तपासणी चालू.

आज 4 पॉझिटिव प्राप्त यापैकी 4 रुग्ण पुरुष (अनुक्रमे वय वर्ष 24,32, 33, 54)आहेत. त्यापैकी 1 रुग्ण स्नेह नगर पोलीस कॉलनी, 1 रुग्ण सांगवी नांदेड, 1 रुग्ण तालुका मुखेड व 1 भोकर येथील असून त्यांच्यापैकी 2 रुग्ण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे , 1 रुग्ण उपजिल्हा रुग्णालय मुखेड, 1 रुग्ण ग्रामीण रुग्णालय भोकर येथे औषध उपचार घेत आहेत सध्या सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.


एकूण 110 तर 5 रुग्णाचा मृत्यू झाला असून, 36 रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. 67 रुग्णांपैकी 10  रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड,  पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व  यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येठील धर्मशाळा कोवीड केअर सेंटर येथे 2 रुग्ण,  शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे 2 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप”डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान