मुखेड शहरात घरीच साजरी झाली ईद-उल-फित्रची नमाज

मुखेड शहरात घरीच साजरी झाली ईद-उल-फित्रची नमाज

प्रतिनिधी/मुखेड:- बल्खी आसद

जगभराला आपल्या विळख्यात घेणा-या कोराना विषाणू मुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम,लग्न समारंभ रद्द करावे लागले. मुखेडात पवित्र रमजान ईद सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करत या वर्षी घरीच नमाज पठण करून साजरी करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
प्रेम,एकता,भाईचा-याच प्रतिक म्हणून ईद ऊल फित्र साजरी केली जाते. दर वर्षी ईद उल फित्र निमित्ताने शहरातील लातूर महामार्गा लगत असलेल्या इदगाह मैदानावर शहरातील मुस्लिम बांधव एकत्र येत नमाज पठण करून जगात एकोपा रहावा,सर्व मानवजाती सलोख्याने राहावी,सर्वांचे कल्यान व्हावे अशी दुवा मागितली जाते.याच वेळी शहरातील हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्या साठी उपस्थित रहातात. मात्र या वर्षी कोरोणा विषाणू मुळे  डॉ.एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समितिच्या सर्व सदस्यानी आवाहन करून सर्व मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा करावी अशी विनंती केली होती. त्या अनुशंगाने सोमवारी ईद  ऊल फित्र ची नमाज मुखेडात अनेकांनी घरीच पठण केली।
नमाज पठण करून समस्त माणव जातीला या संकटा पासून वाचवण्या साठी दुवा मागितली गेली. नमाज नंतर दर वर्षी प्रमाणे हिंदू बांधवांना शिर्खुर्म्या साठी निमंत्रण असते मात्र कोराेना विषाणू ने या वर्षी सर्वांचा हिरमोड केला. तरी ईद चा उत्साह तसू भर ही कमी झाला नसल्याचे चित्र दिसून आले.
डॉ.एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समितिचे अध्यक्ष शेख बबलु,ईस्माईल पठान,पत्रकार शेख  महेताब,पत्रकार रियाज शेख, रऊफ मुल्ला,अब्दुल सय्यद,मुनवर शेख,इम्रान अत्तार ,गौस पठान,इस्माईल बागवान ,उस्मान शेख,अकरम रज़ा,इब्राहिम चाऊस,मोगू  दफेदार,असलम मुल्ला,वसिम मुल्ला,शहादत धुंन्दी,हरुन होनवडजकर,बन्टी सोनकामळे, सतीश पाळेकर,फेरोज सय्यद,इरफान शेख,बालु बनसोडे,किरण कांनडे,विकी घोगरे,समीर अत्तार,खदिर शेख, रफ़ीक शेख,शरिफ मणियार,शबीर बल्खी, यांनी सर्व समस्त मुस्लिम समुदायाचा आभार व्यक्त केले।

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान