एसटीची उद्यापासून जिल्हांतर्गत सेवा :- अनिल परब, परिवहनमंत्री

एसटीची उद्यापासून जिल्हांतर्गत सेवा :- अनिल परब, परिवहनमंत्री

लाल क्षेत्र वगळता ऊर्वरित क्षेत्रात फेऱ्या

एसटीची जिल्हांर्तगत सेवा शुक्रवार, २२ मेपासून सुरू करण्याचे महामंडळाच्या विचाराधीन आहे. लाल क्षेत्र (रेड झोन) वगळता राज्यातील अन्य भागांत ही सेवा सुरू करण्यात येईल. यामध्ये प्रवाशांना सामाजिक अंतरापासून सर्व नियम पाळावे लागतील, अशी माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब चर्चा करुन निर्णय घेणार आहेत.

सध्या एसटीची नियमित सेवा कुठेही सुरू नाही. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक सेवा सुरू आहे. तसेच कामगार, मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठीही एसटीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे.

मध्यंतरी राज्यांतर्गत सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर झाला. परंतु, तो त्वरीत मागे घेण्यात आला. टाळेबंदीच्या चौथ्या पर्वात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात आली असून, लाल आणि ऊर्वरित अशा दोन क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये लाल क्षेत्र वगळता ऊर्वरित क्षेत्रांत सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नवीन आदेश २२ मेपासून लागू होणार असल्याने एसटी महामंडळानेही त्याच दिवसापासून सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.

दरम्यान, कामगार, मजुरांना परप्रांतात एसटीने सोडले जात आहे. २२ मे पासून जिल्हांतर्गत एसटी सुरू झाल्यास या दोन्हीचे नियोजन कसे करणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रवाशांसाठी नियमावली?

एसटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक , औरंगाबाद यांसह लाल क्षेत्र असलेल्या भागांत एसटी सुरू होणार नाही. ऊर्वरित क्षेत्रांत परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हांर्तगत एसटी सेवा सुरू केली जाईल. जिल्ह्य़ाच्या बाहेर गाडय़ा सोडल्या जाणार नाहीत. ही सेवा सुरू केल्यास जिल्ह्य़ांतील उद्योगधंदे व अनेक कामांना गती मिळेल. मात्र प्रवाशांना प्रवासादरम्यान काही नियम पाळावे लागतील. यात प्रत्येक आसनावर एकच प्रवासी घेण्यात येईल. उभ्याने प्रवास करता येणार नाही. प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक असेल. महत्त्वाची बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील मुलांना प्रवास करता येणार नाही. केवळ अतिमहत्त्वाच्या वैद्यकीय कामासाठी त्यांना प्रवासाची मुभा दिली जाईल. या नियमांची अंमलबजावणी नेमकी कशा प्रकारे करावी, याचा विचारही के ला जात असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हांर्तगत एसटी सेवा सुरू करण्यासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होईल. त्यानंतरच निर्णय घेऊन एसटी सेवा सुरू केली जाईल.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.