मुस्लिम बांधवांनी रमजान ईद घरी राहून साजरी करावी, मुख्यमंत्र्यांचं मुस्लीम बांधवांना आवाहन


  1. मुंबई:- राज्यात कोरोना स्थिती गंभीर होत
    चालल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना घरातूनच प्रार्थना आवाहन करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. होळीनंतर सर्व सण शिस्तीने साजरे केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत असल्याचे त्यांनी कबूल केले.


राज्यात मे अखेरच्या आठवड्यापर्यंत दीड लाख रुग्ण होतील, अशी भिती वर्तवण्यात येत होती. मात्र आपण दाखवलेल्या जिद्दीमुळे ही संख्या मर्यादित राहिल्याचे त्यांनी सांगितले. पण प्रत्यक्षात ३३ हजार ७८६ रुग्ण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४७ हजार १९० अशी झाली आहे. आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३३ हजार ७८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे –
आपण काही लाखांमध्ये रुग्णशय्या तयार केल्या आहेत.
या पुढची लढाई अधिक बिकट होणार, केसेस वाढण्याची शक्यता आहे.
साडे तीन लाखाच्या आसपास टेस्ट झाल्या आहेत.
एकूण आकडा जरी 47 हजार असला तरी 13 हजार 47 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत
महाराष्ट्रात 33 हजार 786 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
सव्वा लाख रुग्ण अपेक्षित होते मात्र आता प्रत्यक्षात 33 हजार रुग्ण आहेत.
किमान दीड लाख रुग्ण महाराष्ट्रात होऊ शकतो अशी भीती केंद्रीय पथकाने व्यक्त केली होती.
गेल्या काही दिवसात पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढली आहे,
काही जणांना या परिस्थितीचं गांभिर्य नाहीए
ईदच्या दिवशी मी सर्वांना आवाहन करतो की ईद घऱातल्या घरात प्रार्थना करा. कोरोना लवकर नष्ट होवो अशी दुआ मागा
होळीनंतर कोरोनाची बोंबाबोंब सुरू झाली त्यामुळे आपले सर्व सण शांततेत साजरे केले
मी नियमित आपल्यासमोर येतोय. आपले धन्यवाद करतोय. त्यासोबतच कोरोनाबाबतचे अपडेट देतोय.
महापालिकेकडून घरोघरी जाऊन अशी काही लक्षणं आहेत का याचे सर्वेक्षण सुरू असते.
आपला प्रयत्न हाच आहे की व्हायरस आपल्याकडे पोहोचायच्या आत आपण त्याच्याकडे पोहचायचे
आजारावर औषध नसलं तरी वेळेत उपचार घेतले तर हा आजार लवकर बरा होतो
वेळेत उपचार घेतल्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात
ही लक्षणं समोर आल्यानंतर तत्काळ डॉक्टरकडे जा.
सर्दी खोकला ताप याच्यासोबतच तोंडाची चव जाते, थकवा जाणवते, वास येत नाही ही देखील कोरोनाची प्राथमिक लक्षणं आहेत.
पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या आजारांपासून लांब राहा
पावसाळात खबरदारी घ्यायची आहे. उगाच पावसात भिजू नये, पाणी उकळून प्यावे,
महाराष्ट्राच्या रक्तात लढण्याची जिद्द कशी आहे ते दाखवून द्यावं
पुन्हा एकदा रक्तदानाची गरज, सध्या फक्त 8 ते 10 दिवस पुरेल एवढेच रक्त आहे.
फिल्ड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्सची ऑक्सिजनची सोय करतोय
रुग्णांची आबाळ होतेय हे सत्य आहे. मात्र हे रुग्ण फार मोठे आहे. आता आपल्याकडे फिल्ड हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत.
आपण काही लाखांमध्ये रुग्णशय्या तयार केल्या आहेत.
या पुढची लढाई अधिक बिकट होणार, केसेस वाढण्याची शक्यता आहे.
साडे तीन लाखाच्या आसपास टेस्ट झाल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान