Posts

Showing posts from February, 2021

विद्यार्थ्यांच्या नावात , आडनावात व आई वडिल यांच्या नावातील फरक व जन्मस्थळातील बदल व दुरुस्ती करण्सायाठी एक दिवसीय शिबीराचे आयोजन

Image
विद्यार्थ्यांच्या नावात , आडनावात व आई वडिल यांच्या नावातील फरक व जन्मस्थळातील बदल व दुरुस्ती करण्सायाठी एक दिवसीय शिबीराचे आयोजन  नांदेड :- विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळाने माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेच्या निकालानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा पूवर्वीच्या कालावधीतील विद्यार्थ्यांच्या नावात , आडनावात व आई वडिल यांच्या नावात बदल करुन घ्यावयाचा असेल तर त्यांनी दि . २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू माध्यमीक विद्यालय वसंतनगर नांदेड येथे सर्व कागदपत्रे व पुरावे सोबत घेवून जाणे आणि सदर शिबीर हे एक दिवसासाठी असून याचा पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर विभागीय मंडळानी एका पत्रकाद्वारे केलेले आहे .

डोरनाळीत शिवजयंती निमित्त व्याख्यान,महाप्रसादचा कार्यक्रम संपन्न

Image
 डोरनाळीत शिवजयंती निमित्त व्याख्यान,महाप्रसादचा कार्यक्रम संपन्न मुखेड / प्रतिनिधी    मुखेड तालुक्यातील डोरनाळी येथे शिवजन्मोत्सवा निमित्त दि.२५ फेब्रुवारी रोजी व्याख्यानाचे कार्यक्रम व दि.२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळच्या दरम्यान महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन धव्जारोहन करण्यात आले धव्जारोहनानंतर महाप्रसादाचे कार्यक्रम संपन्न झाले            रयतेचे राजे कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्त तालुक्यातील डोरनाळी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात दि.२५ फेब्रुवारी रोजी संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष तथा शिवव्याख्याते शाम पाटील कुशावाडीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलबंरकर, संभाजी बिग्रेडचे देगलुर तालुकाध्यक्ष किरण पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता या सर्वांनी संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,डाॅ बाबासाहेब आंबेडकर याच्यांसह सर्व महापुरूषांचे अनमोल कार्य व त्यांच्या विचारावर प्रकाश टाकला आणी उपस्...

शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा

Image
 शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा मुखेड, प्रतिनिधि :-               येथील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मनोहर तोटरे, उपप्राचार्य प्रा. संजीव डोईबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप केरुरे यांची विशेष उपस्थिती होती. यावर्षी कोविडच्या परिस्थितीमुळे जाहिर कार्यक्रमाला फाटा देऊन छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मराठी विभागाच्या वतीने "शब्दशाहिरी" या भित्तीपत्रकाचा "कुसुमाग्रज विशेषांक" प्रा. डोईबळे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.         याप्रसंगी प्रा. संजीव डोईबळे म्हणाले की, मात्तभाषेतून व्यवहार साधणे व आपल्या मनातील भावना प्रगट करणे ही काळाची गरज आहे. आपल्या मराठी भाषाचा डंका प्राचीन काळापासून ते आजपर्यंत चालू आहे. मराठी विभाग प्रमुख डॉ. राम धारासूरकर याप्रसंगी म्हणाले की, जगातील मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्या ३० महत्त्वा...

मुखेडच्या विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार ; कर आकारणीच्या नावाखाली ग्राहकांची लुट,अव्वाच्या सव्वा बिले देणाऱ्या विद्युत कंपनीच्या नावाने बोंबाबोंब

Image
मुखेडच्या विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार ; कर आकारणीच्या नावाखाली ग्राहकांची लुट  अव्वाच्या सव्वा बिले देणाऱ्या विद्युत कंपनीच्या नावाने बोंबाबोंब मुखेड :  विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्याने वीजबिल वसुलीच्या नावावर अनेकांची मुस्कट दाबी करत असून वीज बिलाच्या नावाखाली लाखो रुपयाची वसुली करून अर्धे पैसे हडप करत असल्याने मुखेड तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक व सामान्य जनता त्रस्त झाली असून अव्वाच्या सव्वा बिले देणाऱ्या विद्युत कंपनीच्या नावावर मुखेड तालुक्यात बोंबाबोंब सुरु आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुखेड वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्याने वीज बिल वसुलीच्या नावावर ग्राहकाला अरेरावी करून विद्युत पुरवठा खंडीत करतो म्हणून दमदाटी करत असल्याचा प्रकार मुखेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे व्यावसायिक व सामान्य जनता त्रस्त असताना विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी , कर्मचाऱ्याने अव्वाच्या सव्वा बोगस बनावट रीडिंग टाकून ग्राहकांना जास्तीचे बिले दिली आहे. एका ग्राहकाचे विद्युत बिल 90 रुपये एवढ...

जागतिक आरोग्य संघटना WHO सर्पदंश व्यवस्थापन तज्ञसमिती मध्ये डाॅ. दिलीप पुंडे यांची निवड.

Image
 जागतिक आरोग्य संघटना WHO सर्पदंश व्यवस्थापन तज्ञसमिती मध्ये डाॅ. दिलीप पुंडे यांची निवड.  मुखेड :- प्रतिनिधी             हजारो सर्पदंशाच्या रूग्णांना वाचवणारे मुखेड व मराठवाडाभूषण-डॅा.दलीप पुंडे यांची जागतिक आरोग्य संघटना WHO सर्पदंश व्यवस्थापन तज्ञसमिती मध्ये डाॅ. दिलीप पांडुरंग पुंडे यांची निवड झाली आहे. 'विषाची परिक्षा पाहू नये 'अशी म्हण मराठीत प्रसिध्द आहे त्या मुळे विष आणी त्याचा संसर्ग ज्यामुळे  होतो त्या सर्पदंशाबद्दल लोकांमध्ये भीती आहे. याच सर्प दंशाबाबत लोकांमधील भिती घालवण्याचे तसेच याबाबत जनजागृती करण्याचे महान कार्य मुखेड भुषण डॅा.दलीप पांडुरंग यांनी केले आहे. गेल्या दोन दशकांत सर्पदंशामुळे दहा लाखाहून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याचा अभ्यास जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यांनी करण्यात आला आहे. सर्पदंशाने नाटकीयदृष्ट्या प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारत आहे. आणि जगातील वार्षिक मृत्यूच्या एकूण संख्येच्या निम्म्या भागामध्ये पण आहे. ‘राष्ट्रीय प्रतिनिधी दरवर्षी  मृत्युचे दर अभ्यासात म्हणून  जागतिक आरोग्य संघटनेने...

अजयदीप कंस्ट्रक्शनचे अवैध गौन खनिज ऊत्खनन थेट विधानसभेत ,आमदार रावसाहेब अंतापुरकरांनी ऊपस्थितीत केला तारांकित प्रश्न

Image
  अजयदीप कंस्ट्रक्शनचे अवैध गौन खनिज ऊत्खनन थेट विधानसभेत करोडो रुपयांचा शासनाचा महसुल बुडविल्याचा आरोप !  मुखेड / प्रतिनिधि :-        मुखेड तालुक्यातील कुंद्राळा पासुन ते देगलुर तालुक्यातील वझर पर्यत सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ चे काम अजयदीप कंस्ट्रक्शन कडुन सुरु असुन या कामात अजयदीप कंस्ट्रक्शने अवैध मुरुम व दगड ऊत्खनन करुन शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडविल्याचे प्रकरण थेट देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न म्हणून मांडले.  मुखेड तालुक्यातुन सुरु झालेला कुंद्राळा ते देगलुर तालुक्यातील वझर पर्यतचे काम अजदीप कंस्ट्रक्शन कडे असुन या कामाकरीता अजयदीप कंस्ट्रक्शनने बार्‍हाळी,वडगांव,निवळी,डोरनाळी,हंगरगा खु,खतगांव पमु,लखमापुर,सावरमाळ,सुगाव बु,कुंद्राळा,वळंकी,वंडगीर,हणेगांव,वझर,आदी गावातुंन शासनाच्या शासकीय गायरान व शासकीय पट्टेदार व वन विभागाच्या जमिनितुन कुठलीच परवानगी न घेता अजयदीपने अवैध ऊत्खनन केल्याची तक्रार अंतापुरकारांनी संबधित मंञ्याकडे व विभागीय आयुक्ताकडे पुराव्यासहीत निवेदनाद्वा...

महाराष्ट्रातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या SFI ची आदिवासी विकास मंत्र्यांंकडे मागणी

Image
 महाराष्ट्रातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या, अशी मागणी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने आदिवासी विकास मंत्र्यांंकडे ई-मेल निवेदनद्वारे करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की, बदलत्या काळात शैक्षणिक क्षेत्रांतील सर्वच ज्ञानशाखांमध्ये संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच शासनाच्या नविन धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी प्राध्यापकांना पीएचडी अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रध्यापक होवू इच्छिणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी करणे गरजेचे आहे. परंतु आदिवासींच्या एकूण परिस्थीतीचा विचार करता अनेक विद्यार्थ्यांना संशोधन शिक्षण पूर्ण करणे शक्य होत नाही. संशोधन शिक्षणामध्ये आदिवासीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामध्ये पीएचडी अनिवार्य केल्यामुळे केवळ शिक्षण नाही तर एका प्रमुख व्यावसायिक क्षेत्रातून आदिवासी तरुणांना बाहेर फेकले जाईल ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. शासनाने सर्व प्रकारच्या नॉन नेट फेलोशिप बंद केल्या आहेत. त्यामुळे संशोधन शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना दुसरा काही आधार पण शिल्लक राहिलेला नसल्याचे म्हटले आहे....

अनु जाती.जमाती.वि.जा.भ ज.इ.विमाप्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या पशुचिकित्सक महाराष्‍ट्र राज्‍य अध्‍यक्ष पदी डॉ राहुल कांबळे यांची निवड

Image
 अनु जाती.जमाती.वि.जा.भ ज.इ.विमाप्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी  संघटनेच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या पशुचिकित्सक  महाराष्‍ट्र राज्‍य अध्‍यक्ष पदी डॉ राहुल कांबळे यांची निवड पशुसंवर्धन विभागील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न व अन्याय अत्याचाराविरूद्ध संविधानीक मार्गाने  लढा उभारूण विभागातील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही..डॉ.राहुल कांबळे राज्‍यामध्‍ये  विविध प्रकारच्‍या संघटना पहावयास मिळतात पण अनु जाती,जमाती,वि जा, भ ज.,इमाव,विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी कर्मचारी  संघटना ही राज्‍यातील एकमेव संघटना आहे की,राज्‍यातील विविध  शासकीय/ निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांंच्‍‍‍‍या  प्रश्नावर आवाज उठवते आणि  शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहीलेली आहे. अनु जाती,जमाती,वि.जा,भ ज, इमाव्,विमाप्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मा.भारत वानखेडे(मंत्रालय तथा महाराष्ट्र प्रदेश) व संघटनेचे महासचिव - डॉ.उ...

प्रहार मुखेड तालुका उपाध्यक्ष पदी बालाजी राठोड यांची निवड

Image
 प्रहार तालुका उपाध्यक्ष पदी बालाजी राठोड यांची निवड प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुखेड तालुका उपाध्यक्ष पदी मुखेड तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते बालाजी राठोड यांची निवड करण्यात आली आहे. शेतकरी,कष्टकरी,शेतमजूर,कामगार अनाथ,अपंग,वंचित शोषितांच्या न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी मा.ना.बच्चु भाऊ कडू यांचे   विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवत पक्षाची ध्येय - धोरणे  सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.विठ्ठल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व,प्रहार जनशक्ती पक्षाचे मुखेड तालुका अध्यक्ष मा.शंकर अण्णा वडेवार यांच्या हस्ते,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा.प सदस्य शेषेराव पा.बोडके धनजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हि निवड करण्यात आली आहे.अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलतांंना प्रहारचे सोशल मिडिया प्रमुख अनिल घायाळे यांनी दिली आहे.यावेळी प्रहारचे सचिव गोपाळ पाटील हिवराळे जाहुरकर,प्रहार मुखेड शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड,पत्रकार रणजित जामखेडकर मोहन घायाळे,शिवराज वडजे,सुनील चव्हाण प्रहार युवा ता.उपाध्यक्ष,विश्वजीत इंगोले,नामदेव वडजे, संजय होडगीर...

हिमायतनगर नगर पंचायत प्रशासन कडून मतदारांचे सर्वे करण्यास सुरवात,

Image
 हिमायतनगर नगर पंचायत प्रशासन कडून मतदारांचे सर्वे करण्यास झाली सुरवात,  हिमायतनगर प्रतिनिधि :- अजिम हिंदुस्तानी हिमायतनगर शहरात  नगर पंचायत निवडणूक होणार  असून, संपूर्ण हिमायतनगर शहराची मतदारांची  मूळ प्रारूप यादी नगर पंचायत प्रशासनाकडून तयार करण्यात आली होती. सदरील मूळ प्रारूप मतदार याद्या मध्ये प्रत्येक वार्डात इतर वार्डातील मतदारांची नावे सामील झाली होती. तर काही वार्डात बाहेरचे गावातील नातेवाईकांची नावे आप आपल्या वार्डात आणल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला असल्याने सदर मतदार मूळ प्रारूप यादी ची चुका दुरुस्त व्हाव्या व मतदारांचे घर वार्डात आहे किंवा नाही, याचे सर्वे करण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने वेग वेगळ्या वार्डात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या स्थानिक घराची पाहणी करून मतदार याद्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीत आहे. व तसेच प्रत्येक वार्डात जाऊन नगर पंचायत प्रशासन  पंचीनामा करीत आहे. व तसेच हिमायतनगर शहरात प्रत्येक वार्डात ड्रोन कॅमेरेचा नकाशा प्रमाणे सर्वे करण्यास सुरुवात झाली आहे. ड्रोन केमेरेच्या सर्वे नकाशा प्रमाणे मतदारांचे नावे कोणत्या वार्डात य...

युवा पीढ़ीने लेखकांना जपले पाहिजे: नजीर शेख

Image
युवा पीढ़ीने  लेखकांना जपले पाहिजे: नजीर शेख  सरफराज अहमद गेल्या काही वर्षापासून आपल्या लिखाणातून व आपल्या भाषणातून महाराष्ट्रात सुपरिचित आहेत.मराठी माध्यमातून व्यक्त होणारे मुस्लिम लेखक त्यातल्यात्यात प्रभावी वक्ते व लेखक दुर्मिळच आहेत. माझ्यातरी परिचयाचे हे एकच आहेत. मुस्लिम समाजातील आज घडीला मराठी भाषेत प्रभावीपणे लिहिणारे बोलणारे लेखक व वक्ते असतील पण मला ते मला ज्ञात नाहीत त्यामुळे जे असतील त्यांची नावे निदर्शनास आणून द्यावी. प्रभावी लेखकात माझा समावेश मी करीत नाही हेही लक्षात घ्यावे.  ही पोस्ट करण्याचा उद्देश हा आहे की समाजातील युवकांना लेखनाच्या माध्यमातून तर्कनिष्ठ व विवेकी बनवणे राष्ट्रीय एकात्मता जोपासणे देशातील जातीय धर्मांध विचारांच्या विरोधात लिखाण करून येथील जनतेला धर्मनिरपेक्षतेची शिकवण देऊन एक आदर्श समाजाची  निर्मिती करणे ही ध्येय घेवून जे लिहीत आहेत त्यांच्या पाठीशी समाजाने खंभीर रित्या उभे रहावे. ही काळाची गरज झाली आहे तरी प्रभावी  लेखक तयार झाले पाहिजे जे आज होत नाही आहे. जे आहेत त्यांच्या मागे समाज असतो का?   आज घडीला किती जण  आज सरा...

नांदेड लॉकडाऊन संदर्भात कोणताही निर्णय नाही ; अफवा पसरवु नये : निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी

Image
  नांदेड लॉकडाऊन संदर्भात कोणताही निर्णय नाही ; अफवा पसरवु नये : निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी   दि .२० : नांदेड , राज्यात व नांदेड शहरात कोरोनामुळे मृत्यू आणि रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात येणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. सोशल मीडियावरील विविध ग्रुपवर त्या पद्धतीचे ‘मेसेज’ फिरत असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्येही लॉकडाऊन पुन्हा लागू होते की काय, अशी चर्चा सुरू झाली. . यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी  यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट शब्दांत लॉकडाऊन पुन्हा लागू होण्यासंबंधी कोणतीची चर्चा प्रशासकीय पातळीवर झाली नसून, शासनाकडूनही तशा सूचना नसल्याचे सांगितले. , अफवा पसरवु नये व कोव्हीडचे नियम पाळावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे . प्राप्त माहिती नुसार नांदेड शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन ची चर्चा सकाळपासून सुरू होती ती आता थांबली आहे . जनतेने कोरोनाचे नियम पाळत , जबाबदारी घेत व सोशल डिस्टन्स पाळून कार्य केले तर नक्किच लॉ...

मुखेडात शिवजन्मोत्सव निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम

Image
 मुखेडात शिवजन्मोत्सव निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम व्याख्यान, रक्तदान शिबीर, कवीसंमेलनाचे आयोजन मुखेड : प्रतिनिधी        रयतेचे राजे, कुलवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने शासनाच्या आदेशाचे पालन करुन प्रबोधनात्मक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.       शिवजन्मोत्सवा निमित्त शिवस्मारक येथे गुरुवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य डाॅ.उमाकांत राठोड, औरंगाबाद यांचे व्याख्यान होणार आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर तर उद्घाटक काँग्रेस कमीटी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पा.मंडलापुरकर यांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शिवस्मारक येथे ध्वजारोहन आ.डाॅ.तुषार राठोड यांच्या हस्ते होणार आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, तर प्रतिमापुजन माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच ११ वाजता शिवस्मारक परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन संकल्प क...

पंडित दीनदयालजी उपाध्याय स्मृतिदिना निमित्त समर्पण सप्ताहचे आयोजन :- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

Image
  पंडित दीनदयालजी उपाध्याय स्मृतिदिना निमित्त समर्पण सप्ताहचे आयोजन :- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर नांदेड प्रतिनिधि :- पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड च्या वतीने समर्पण दिन घेण्यात आला असून आगामी आठवड्यात समर्पण सप्ताह घेण्यात येणार असल्याची माहिती महानगराध्यक्ष प्रवीण साले व अभियान प्रमुख धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात  सुरुवातीला जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक करताना ॲड. ठाकूर यांनी समर्पण दिना बद्दलची माहिती दिली. प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन कार्याची माहिती देऊन प्रत्येक भाजप सदस्याने समर्पण निधी देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगांवकर, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस श्रावण भिलवंडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, जिल्हा उपाध्यक्ष शितल खांडील, महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. श...

मुखेड नगर परिषदेचे संस्था व गुत्तेदारांना पाठबळ तर "मजुर कामगार वाऱ्यावर"

Image
मुखेड नगर परिषदेचे संस्था व गुत्तेदारांना पाठबळ तर "मजुर कामगार वाऱ्यावर" मुखेड/प्रतिनिधि :- मुखेड नगर परिषद प्रशासनाच्या सोईसाठी व विविध कामे करण्यासाठी अनेक संस्था व व्यक्तिगत गुत्तेदारां मार्फत मनुष्यबळ व कामगार ईतर यंत्रणा पुरवण्यासाठी करारनामे करुन कामे देण्यात आलेली आहेत . त्या प्रत्येक करारनाम्यात गुत्तेदाराने पुरवण्यात आलेल्या कामगारास कामगार विषयक सर्व नियम भविष्य निर्वाह निधी , किमान वेतन कायदा , कामगार विमा , गट विमा , आरोग्य सुविधा व ईतर सर्व सुविधा पुरवणे बंधनकारक असुन निविदा मंजुर झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 अन्वये ई.पी.एफ. क्रमांक असणे आवश्यक असुन तो नसल्यास तो एक महिन्यात काढुन घेणे बंधनकारक आहे असे करारनाम्यात स्पष्टपणे नमुद आहे .  कंत्राटदारांनी एक वर्ष होऊनही ई .पी .एफ क्रमांक नपाला आजपर्यंत दिलेला नाही . कंत्राटदारा मार्फत ई.पी.एफ. भरणे दुरच राहिले , अशाच एका प्रकरणात मे . मजुर सहकारी संस्था म . कुंद्राळा या संस्थेस मजुर पुरवण्यासाठी 16 डिसेंबर 2019  रोजी करारनामा करुन नपा . मुख्याधीकारी मार्फत कंत्राट देण्यात आले . या वा गुत्तेदाराकडे का...

मुखेड तालुक्यात 'माझ गाव सुंदर गाव' उपक्रमाचा सकनुर येथुन सुरूवात...

Image
  मुखेड तालुक्यात  'माझ गाव सुंदर गाव' उपक्रमाचा सकनुर येथुन सुरूवात... गटविकासधिकारी,कर्मचारीसह, प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती...        मुखेड / प्रतिनिधी          विभागीय आयुक्त सुनिल केद्रेंकर यांच्या संकल्पनेतुन माझ गाव सुंदर गाव हा नाविण्यपुर्ण उपक्रम अौरगांबाद विभागात राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार व मुखेडचे  गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालया अंतर्गत माझं गाव,सुंदर गाव या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ सकनूर ग्रामपंचायत येथून करण्यात आली सदर  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सदस्या सौ केवळबाई पाटील ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती मुखेड चे गटविकास अधिकारी टी.के भालके ,माजी जिल्हा परिषद चंद्रकांत घाटे, माजी सरपंच बालाजी पाटील,विस्तार अधिकारी पि.एन.गर्जे, एस.व्ही येवते,सचिन आहीरे, कृषिधिकारी पि.व्ही देशमुख,आरोग्य विस्तार अधिकारी सचिन पांढरमिसे,   ग्रामसेवक संजय जाधव ...

मुखेड येथे महावितरण विरोधात भाजपाचे "टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

Image
  भारतीय जनता पार्टी मुखेड च्या वतीने महावितरण कार्यालयाला ताला ठोको व हल्लाबोल’आंदोलन करण्यात आले  मुखेड/प्रतिनिधि :-बल्खी आसद  भारतीय जनता पार्टी मुखेड  च्या वतीने महावितरण कार्यालयाला ताला ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या  महावितरणाच्या निषेधार्थ आज  शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजी  . भाजपा मुखेड  शहर च्या  वतीने महावितरण केंद्रांवर "टाळा ठोको व हल्लाबोल" आंदोलन करण्यात आले. महावितरण कार्यालयासमोर ३० मिनट  भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण व आघाडी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजपा जिल्हाउपाध्य्क्ष अशोक गजलवाड प्रास्ताविक करताना आंदोलन करण्यामागची भूमिका विशद केली.  यापुढे नांदेड शहरात कोणाचेही विद्युत कनेक्शन कट केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. आमदार  तुषार  राठोड .  खुशाल पाटील उमरदरीकर,डॉ. वीरभद्र हिमगिरे, डॉ.माधव पाटील उच्...

"बेटमोगरा येथे मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने रमाई जन्मोत्सवा निमीत्त पुरस्कार प्रदान व पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन."

Image
  "बेटमोगरा येथे मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने  रमाई जन्मोत्सवा निमीत्त पुरस्कार प्रदान व पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन." "बेटमोगरा येथे ७ फेब्रुवारी रोजी ज्योतीताई घोडके व बुद्ध संदेश ऑक्रेस्ट्रा यांच्या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम." मुखेड :-  बेटमोगरा येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था गेली सात वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत मानव कल्याणासाठी सामाजिक क्षेत्रात,कधी वयोवृद्ध व्यक्तीसाठी मायेचा हात देत मोफत नेत्र तपासणी, विविध प्रकारची आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,व्याख्यानमाला व समाज प्रबोधनपर कार्यक्रम अशा विविध प्रकारचे सामाजिक कार्य या रमाई फाऊंडेशन च्या माध्यमातून तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे.या मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनकांबळे व सचिव भारत सोनकांबळे यांच्या माध्यमातून दरवर्षी  ७ फेब्रुवारी रोजी महामाता,त्यागमुर्ती, विश्वरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली म्हणजेच माता रमाबाई आंबेडकर यांच्या जन्मोत...

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अदनान पाशा सचिवपदी विजय लोहबंदे तर कार्याध्यक्ष गिरीधर पा.केरुरकर

Image
  सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अदनान पाशा सचिवपदी विजय लोहबंदे तर कार्याध्यक्ष गिरीधर पा.केरुरकर मुखेड :  प्रतिनिधी        रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक, कुलवाडीभुषण, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त २०२१ साली आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अदनान पाशा नाजीमोद्दीन यांची तर सचिवपदी विजय लोहबंदे, कार्याध्यक्षपदी गिरीधर पाटील केरुरकर यांच्यासह समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली.        संपूर्ण राज्याला आदर्श असावा अशी सर्वधर्म-जातीच्या नागरिकांना सोबत घेऊन शहरात अनेक वर्षापासून सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. यंदा २०२१ सालच्या शिवजन्मोत्सव समिती गठित करण्यासाठी छत्रपती शिवस्मारक येथे बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जेष्ठ नेते सदाशिवराव पाटील जाधव, माजी उपनगराध्यक्ष गंगाधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड, ओबिसी नेते डाॅ.श्रावण रॅपनवाड, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, माजी उपनगराध्यक्ष प्र. रामदास पाटील, मनसे तालुकाध्यक्ष सं...

रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट ! अकादमी

Image
  मुंबई , दि . १ फेब्रुवारी २०२१ :- क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक असून , यासंदर्भात कुलकर्णी यांनी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना . अशोक चव्हाण यांची भेट घेऊन विचारविनिमय केला . सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व ' क्रिककिंगडम'चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर ना . चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली . नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून , ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल , अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली . कुलकर्णी यांनी यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली . कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून ना . अशोक चव्हाण यांना एक टी - शर्ट भेट दिले . या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे .

रेतीचा अवैध साठा रिकाम्या जागेवर असल्यास जागा मालकांवरही गुन्हे होतील दाखल :- जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर

Image
  नांदेड:- जिल्ह्यातील गोदावरी पात्र व इतर नदी क्षेत्रातील अवैधरित्या होणाऱ्या रेती उत्खननाला आळा बसण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तराफे उध्दस्त करण्यासमवेत रेतीचे वाहने जप्त केली जात आहेत . अवैध रेती उत्खननाला आळा बसावा यासाठी आता आम्ही अधिक कठोर पावले उचलत असून नांदेड महानगर पालिका , जिल्ह्यातील नगर परिषदा व ग्राम पंचायतीच्या हद्दीत जिथे कुठे मोठया प्रमाणावर वाळू साठा उपलब्ध असेल तो जिल्हा प्रशासनातर्फे जागच्या जागीच जप्त करुन जाच्या मालकीची ती जागा / प्लॉट आहे त्या प्लॉटधारकाविरुध्द गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी आज दिला . त्यांच्या अध्यक्षतेखाली आज अवैध रेती उत्खनाना बद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक संपन्न झाली . या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे , मनपा आयुक्त डॉ . सुनिल लहाने , अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी , उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी , तहसिलदार किरण अंबेकर उपस्थित होते . सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी , तहसिलदार यांनी या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेतला...

शेतकरी नेते डाॅ अजित नवले यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ DYFI शी:- काॅ अंकुश माचेवाड

Image
  शेतकरी नेते डाॅ अजित नवले यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ डीवायएफआयशी काॅ अंकुश माचेवाड यांचा इशारा जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा केला जाहीर निषेध मुखेड / प्रतिनिधी     किसान सभेचे राज्य सचिव शेतकरी नेते काॅम्रेड डाॅ.अजित नवले यांना सोशल मिडियावर काही गुंडांनी धमकी दिली आहे.की सत्ताधारी आस्थापनेविरुद्ध संघर्ष सुरू ठेवल्यास तुमच्या वर गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आली होती.कॉ डॉ अजित नवले हे महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसचिव , एक संघर्षशील शेतकरी नेते आणि आमचे मार्गदर्शक व अभ्यासू वक्ते आहेत.कॉ डॉ अजित नवले यांना धमकावणाय्राचा या भ्याडपणा करणाऱ्याचा डिवायएफआय युवा संघटना तीव्र निषेध करत आहे. डॉ अजित नवले यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ डिवायएफआयशी राहिल. नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी व युवक रस्त्यावर उतरवू आणि उग्र आंदोलन करू असा इशारा डिवायएफआयाचे तालुका अध्यक्ष काॅम्रेड अंकुश माचेवाड यांनी दिला आहे. अशा धमक्या या आमच्या लोकशाही आणि घटनात्मक हक्कांवरील हल्ला आहे.अशा धमक्या आपल्याला किंवा आपल्या संघर्षाला रोखू किंवा घाबरू शकत नाहीत. आपण जन...