शेतकरी नेते डाॅ अजित नवले यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ DYFI शी:- काॅ अंकुश माचेवाड

 शेतकरी नेते डाॅ अजित नवले यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ डीवायएफआयशी काॅ अंकुश माचेवाड यांचा इशारा

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा केला जाहीर निषेध


मुखेड / प्रतिनिधी 

   किसान सभेचे राज्य सचिव शेतकरी नेते काॅम्रेड डाॅ.अजित नवले यांना सोशल मिडियावर काही गुंडांनी धमकी दिली आहे.की सत्ताधारी आस्थापनेविरुद्ध संघर्ष सुरू ठेवल्यास तुमच्या वर गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आली होती.कॉ डॉ अजित नवले हे महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसचिव , एक संघर्षशील शेतकरी नेते आणि आमचे मार्गदर्शक व अभ्यासू वक्ते आहेत.कॉ डॉ अजित नवले यांना धमकावणाय्राचा या भ्याडपणा करणाऱ्याचा डिवायएफआय युवा संघटना तीव्र निषेध करत आहे. डॉ अजित नवले यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ डिवायएफआयशी राहिल. नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी व युवक रस्त्यावर उतरवू आणि उग्र आंदोलन करू असा इशारा डिवायएफआयाचे तालुका अध्यक्ष काॅम्रेड अंकुश माचेवाड यांनी दिला आहे.

अशा धमक्या या आमच्या लोकशाही आणि घटनात्मक हक्कांवरील हल्ला आहे.अशा धमक्या आपल्याला किंवा आपल्या संघर्षाला रोखू किंवा घाबरू शकत नाहीत. आपण जनतेच्या न्याय हक्कासाठी लढता त्यामुळे सर्वसामान्य जनता, कष्टकरी , कामगार, शेतकरी, युवक आपल्या सोबत खंबीरपणे उभे आहेत.अशा धमक्यांचा आम्ही डिवायएफआयच्या वतिने जाहिर निषेध करतो.असे काॅम्रेड अंकुश माचेवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान