मुखेड येथे महावितरण विरोधात भाजपाचे "टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन
भारतीय जनता पार्टी मुखेड च्या वतीने महावितरण कार्यालयाला ताला ठोको व हल्लाबोल’आंदोलन करण्यात आले
मुखेड/प्रतिनिधि :-बल्खी आसद
भारतीय जनता पार्टी मुखेड च्या वतीने महावितरण कार्यालयाला ताला ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजी . भाजपा मुखेड शहर च्या वतीने महावितरण केंद्रांवर "टाळा ठोको व हल्लाबोल" आंदोलन करण्यात आले.
महावितरण कार्यालयासमोर ३० मिनट भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण व आघाडी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजपा जिल्हाउपाध्य्क्ष अशोक गजलवाड प्रास्ताविक करताना आंदोलन करण्यामागची भूमिका विशद केली. यापुढे नांदेड शहरात कोणाचेही विद्युत कनेक्शन कट केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. आमदार तुषार राठोड . खुशाल पाटील उमरदरीकर,डॉ. वीरभद्र हिमगिरे, डॉ.माधव पाटील उच्चेकर, अशोक गजलवाड, किशोरसिंह चौहान गोविंद घोगरे,राम सावकार,सुधीर चव्हाण, व्यंकट जाधव सर,महावीर शिवपूजे,बाळू काळे,शिवाजी राठोड,विनोद दंडलवाड, मुजिफ सौदागर,राजू रंनभीडकर,करण रोडगे,राजू पाटील उद्रि,व्यंकट सम्राले, सुधीर रापनवाड निषेध व्यक्त केला.

Comments
Post a Comment