मुखेड तालुक्यात 'माझ गाव सुंदर गाव' उपक्रमाचा सकनुर येथुन सुरूवात...
मुखेड तालुक्यात 'माझ गाव सुंदर गाव' उपक्रमाचा सकनुर येथुन सुरूवात...
गटविकासधिकारी,कर्मचारीसह, प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती...
मुखेड / प्रतिनिधी
विभागीय आयुक्त सुनिल केद्रेंकर यांच्या संकल्पनेतुन माझ गाव सुंदर गाव हा नाविण्यपुर्ण उपक्रम अौरगांबाद विभागात राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार व मुखेडचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालया अंतर्गत माझं गाव,सुंदर गाव या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ सकनूर ग्रामपंचायत येथून करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सदस्या सौ केवळबाई पाटील ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती मुखेड चे गटविकास अधिकारी टी.के भालके ,माजी जिल्हा परिषद चंद्रकांत घाटे, माजी सरपंच बालाजी पाटील,विस्तार अधिकारी पि.एन.गर्जे, एस.व्ही येवते,सचिन आहीरे, कृषिधिकारी पि.व्ही देशमुख,आरोग्य विस्तार अधिकारी सचिन पांढरमिसे, ग्रामसेवक संजय जाधव होनवडजकर यांची प्रमुख उपस्थिती होती
माझ गाव सुंदर गाव या उपक्रमाच्या माध्यमातून गाव फेरी, शासकीय इमारत पाहणी, गावातील स्वच्छते विषयी जनजागृती व सुचना तसेच ओला सुखा कचरा संकलन कुंड्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.अभियानाबद्दल मार्गदर्शन करताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके म्हणाले की गावात प्रवेश करताच जे पहायला मिळाले व प्रास्ताविकात जे ऐकायला मिळाले त्यात काहीच तफावत जाणवत नाही याचाच अर्थ मागील ग्रामपंचायत मध्ये अतिशय नियोजन बध्द काम झाले आहे त्याबद्दल सकनुर गावाचे संरपंच व संद्स्याचे अभिनंदन त्याचबरोबर ज्या अर्थी इतका वेळ होऊनही मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमास उपस्थित आहेत त्या अर्थी हे गाव निश्चितच सुंदर होणार यात काही शंका नाही फ़क्त घोषणा होणे बाकी असल्याचे सांगितले या कार्यक्रमात चंद्रकांत घाटे, विस्तार अधिकारी येवते ,गर्जे यांनी आपले विचार मांडले तर माजी सरपंच बालाजी पाटील यांनी निश्चितच गाव सुंदर करून सकनूर गाव जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून पुढे येईल अशी हमी दिली.
या कार्यक्रमास आजुबाजुच्या ५ ते ६ गावाचे आजी माजी सरपंच,प्रतिष्ठित नागरिक व ग्रामसेवकांची उपस्थिती होती
सकनुर या गावी माझ गाव सुंदर गाव कार्यक्रम यशवी करण्यासाठी गणेश पाटील लामतुरे, मुख्याध्यापक बालाजी पाटील, श्याम लामतुरे, परशराम कारळे, माधव जाधव, बालाजी बोईनवाड,बाबाराव लामतुरे, शिवाजी कारळे ,बापूराव लामतुरे,ग्रामसेवक संजय पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सहशिक्षक अनारगट्टे यांनी मानले

Comments
Post a Comment