"बेटमोगरा येथे मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने रमाई जन्मोत्सवा निमीत्त पुरस्कार प्रदान व पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन."

 "बेटमोगरा येथे मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने  रमाई जन्मोत्सवा निमीत्त पुरस्कार प्रदान व पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन."


"बेटमोगरा येथे ७ फेब्रुवारी रोजी ज्योतीताई घोडके व बुद्ध संदेश ऑक्रेस्ट्रा यांच्या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम."


मुखेड :-

 बेटमोगरा येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था गेली सात वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत मानव कल्याणासाठी सामाजिक क्षेत्रात,कधी वयोवृद्ध व्यक्तीसाठी मायेचा हात देत मोफत नेत्र तपासणी, विविध प्रकारची आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,व्याख्यानमाला व समाज प्रबोधनपर कार्यक्रम अशा विविध प्रकारचे सामाजिक कार्य या रमाई फाऊंडेशन च्या माध्यमातून तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे.या मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनकांबळे व सचिव भारत सोनकांबळे यांच्या माध्यमातून दरवर्षी  ७ फेब्रुवारी रोजी महामाता,त्यागमुर्ती, विश्वरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली म्हणजेच माता रमाबाई आंबेडकर यांच्या जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दि.७ फेब्रुवारी २०२१ रोज रविवारी संस्थेचे सचिव तथा धडाडीचे निर्भिड पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या संयोजनातून बेटमोगरा येथील धम्मशील बुद्धविहार येथे रमाई जन्मोत्सव व  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार प्रदान सोहळा व पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पुरस्काराचे मानकरी दै.आजचा लोकप्रश्न या वर्तमान पत्राचे आवृती संपादक मा.मदन शेळके, तसेच कंधार तालुक्यातील निर्भीड व धडाकेबाज दै.बहुरंगी वार्ता चे पत्रकार राजेश्वर कांबळे, तसेच सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे युवा व्याख्याते सिद्धार्थ कांबळे बेळीकर आदिंना त्यांच्या कार्याबद्दल इत्यादींना यावर्षीचा रमाई फाऊंडेशन बेटमोगरा चा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यांसह जिल्हाभरातील पत्रकार बांधवांचा यथोचीत सन्मान रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने करण्यात येणार असल्याची माहीती रमाई फाऊंडेशन बेटमोगरा चे सचिव तथा दै.लोकप्रश्न वृत्तपत्राचे निर्भिड पत्रकार भारत सोनकांबळे यांनी प्रसीद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. मागील वर्षात

 मुखेड तालुक्यात सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे,मराठवाडा भूषण तथा मुखेड भूषण सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ. दिलीपराव पुंडे व मुखेड तालुक्यासह सबंध नांदेड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात व आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे मा.दशरथराव लोहबंदे,तसेच मुखेड तालुक्यात आंबेडकरी चळवळीला गीत गायनाच्या रूपात जीवंत ठेवत उल्लेखनीय कार्य करणारे गायक तेजेराव भद्रे सह तालुक्यात पशू वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणारे डॉ. राहुल कांबळे इत्यादींना मागील वर्षीचा रमाई फाऊंडेशन बेटमोगरा चा समाजकार्य पुरस्कार देण्यात आला होता.

बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील साऊली,देशातील बहुजनांची माऊली,म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी माता रमाबाई भीमराव आंबेडकर.रमाई म्हणजे भारतभूमीच्या उदारातील कोहिनूर हिरा घडवणारी कस्तुरी आपल्या आयुष्यभराच्या त्यागाने अन् श्रमाने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्याला माता रमाबाई भिमराव आंबेडकर या माऊलीचे अतिशय महत्वाचे योगदान लाभले आहे.

 "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची महत्वाची भूमिका" या उक्तीप्रमाणे हा पुरस्कार  देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची रूपरेषा पहिल्या सत्रात सकाळी  ९:०० वाजता धम्म ध्वजारोहण सेवानिवृत पोलीस आयु.दिगांबर सोनकांबळे बेटमोगरेकर यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळी ठिक १० वा. मा.अॅड.तानाजी वाघमारे (दिवानी व फौजदारी न्यायालय,मुखेड व प्रा. चंद्रकांत गायकवाड ( ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर) यांचे व्याख्यान होणार आहे.तद्नंतर दुपारी १२ वा. पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उद्धाटन बेटमोगरा येथील प्रतिष्ठीत नागरीक मा.चिनू पाटील यांच्या हस्ते तर या कार्यकमाचे अध्यक्ष मा.दत्तात्रय बालाजीराव पाटील हे असणार आहेत. या कार्यक्रमाला मा.अनिल सिरसे ( रि.प. सेना जिल्हाध्यक्ष नांदेड),मा.डॉ.राहुल कांबळे (पशुधन विमा अधिकारी), मा.शिवाजी पाटील बेटमोगरेकर,खुशाल जी पाटील,वैजनाथ पाटील, मष्णा पा.बा-हाळे, डॉ.जगदीश कांबळे देगलूरकर ( वैधकीय अधिकारी),ललीताबाई सोनकांबळे, मोहनदादा गायकवाड ( तालुकाध्यक्ष प्रजासताक पार्टी,मुखेड) मा.सुशील पत्की (पत्रकार), मा.दतात्रय कांबळे (पत्रकार),विजय बनसोडे (पत्रकार),मेहताब शेख (पत्रकार),अनिल कांबळे सलगरकर (पत्रकार), जैनोद्दीन पटेल ,(पत्रकार),संजय कांबळे (पत्रकार), आशीष कुलकर्णी (पत्रकार), गंगाधर सोंडारे (पत्रकार),ज्ञानेश्वर डोईजड (पत्रकार), जयभीम सोनकांबळे (संपादक),नामदेव यलकटवार (संपादक), रणजीत जामखेडकर (पत्रकार), आसद बलखी (पत्रकार), विठ्ठल कल्याणपाड (पत्रकार), मोतीपाशा पाळेकर (पत्रकार),पवन जगडमवार (पत्रकार), सचिन च०हाण (पत्रकार), मुस्तफा पिंजारी (पत्रकार) तसेच निवृत्ती पोटफोडे, व्यंकट सोनकांबळे,माधव सोनकांबळे, बालाजी सोनकांबळे, सुरेश नवलेकर, रामजी सोनकांबळे (सर), यशवंत सोनकांबळे,दिलीप भद्रे,हरी कांबळे, आनंदा सोनकांबळे, सुरेश सोनकांबळे, पंढरी सोनकांबळे, गौतम सोनकांबळे,खंडू सोनकांबळे (फिटर), प्रल्हाद सोनकांबळे,मष्णा गायकवाड, गोविंद सोनकांबळे, शिवाजी सोनकांबळे,यादव सोनकांबळे, सुनील सोनकांबळे,नागेश सोनकांबळे,अनिल सोनकांबळे,शंकर सोनकांबळे, विकास सोनकांबळे, इत्यादींची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.

तसेच कार्यक्रमाचे दुसरे सत्र रात्री. ८:०० वा. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायीका आयु.ज्योतीताई घोडके व बुद्ध संदेश ऑक्रेस्ट्रा यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.धनराज शिवराज पाटील  बेटमोगरेकर यांच्या हस्ते तर या कार्यकमाचे अध्यक्ष - श्री. सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर हे असणार आहेत.तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे सचिव पत्रकार भारत सोनकांबळे सह रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या  वतीने करण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान