अनु जाती.जमाती.वि.जा.भ ज.इ.विमाप्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या पशुचिकित्सक महाराष्‍ट्र राज्‍य अध्‍यक्ष पदी डॉ राहुल कांबळे यांची निवड

 अनु जाती.जमाती.वि.जा.भ ज.इ.विमाप्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी  संघटनेच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या पशुचिकित्सक  महाराष्‍ट्र राज्‍य अध्‍यक्ष पदी डॉ राहुल कांबळे यांची निवड



पशुसंवर्धन विभागील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न व अन्याय अत्याचाराविरूद्ध संविधानीक मार्गाने  लढा उभारूण विभागातील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही..डॉ.राहुल कांबळे


राज्‍यामध्‍ये  विविध प्रकारच्‍या संघटना पहावयास मिळतात पण अनु जाती,जमाती,वि जा, भ ज.,इमाव,विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी कर्मचारी  संघटना ही राज्‍यातील एकमेव संघटना आहे की,राज्‍यातील विविध  शासकीय/ निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांंच्‍‍‍‍या 

प्रश्नावर आवाज उठवते आणि  शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी

अग्रेसर राहीलेली आहे.

अनु जाती,जमाती,वि.जा,भ ज, इमाव्,विमाप्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मा.भारत वानखेडे(मंत्रालय तथा महाराष्ट्र प्रदेश) व संघटनेचे महासचिव - डॉ.उत्तमराव सोनकांबळे

यांच्या नेतृत्वाखाली दि.२३ फेब्रुवारी रोजी नांदेड यशवंतराव सभागृह जिल्हा परिषद सभागृहात संघटनेच्या विभागीय बेठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस

छत्रपती शिवाजी महाराज ,क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,आरक्षणाचे जणक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, व तसेच  संतश्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या जयंती च्या अनुषंगाने या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील धुरंधर मुखेड तालुक्यातील उगवतं नेतृत्व,पशुसंवर्धन या आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्यशैलीचा एक वेगळाच ठसा उमटवलेले, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव व नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पशुधन विमा अधिकारी डॉ.राहुल कांबळे यांची अनु जाती,जमाती,वि.जा,भ ज, इमाव्,विमाप्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी  संघटनेच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या  महाराष्‍ट्र राज्‍य अध्‍यक्ष पदी निवड करण्यात आली. या क्षणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.भारत वि.वानखेडे व राज्याचे महासचिव डॉ.उत्तमराव सोनकांबळे

नांदेड जिल्हाध्यक्ष जितेंद्र कांबळे,दै.समिक्षा चे संपादक रुपेश पाडमुख, सह जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी आदि मान्यवरांच्या हस्ते डॉ.राहुल कांबळे यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र व शाल पुष्पहाराने सन्मान करण्यात आला.

 यावेळी डॉ.राहुल कांबळे यांनी पदभारस्विकारल्यानंतर

संघटनेच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न व अन्याय अत्याचाराविरूद्ध संविधानीक मार्गाने  लढा उभारूण पशुसंर्वधन विभागातील अधिकारी कर्मचारी यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे भाकीत केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.भारत वा.वानखेडे हे होते. या कार्यक्रमाला राज्याचे सचिव दिनानाथ जोंधळे, संघटक सचिव राजेंद्र धावारे, आदिवाशी विकास विभागाचे राज्य अध्यक्ष राजरत्न पवार, वैद्यकीय शिक्षण व रुगणालयाचे

रामचंद्र वनंजे,प्राध्यापक संघटनेचे डॉ.नितीन गायकवाड,मराठवाडा विद्यापिठ अध्यक्ष हणवते, दिनेश सुर्यवंशी ( कै.शंकरराव चव्हाण रुग्णालय,नांदेड), सय्यद बशीर (मराठवाडा अध्यक्ष), व विविध क्षेत्रातील शासकीय,निमशासकीय

अधिकारी कर्मचारी व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे महासचिव  डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांनी केले. सुत्रसंचलान सुनील वाघमारे यांनी तर आभार दिनानाथ जोंधळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान