नांदेड लॉकडाऊन संदर्भात कोणताही निर्णय नाही ; अफवा पसरवु नये : निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी
नांदेड लॉकडाऊन संदर्भात कोणताही निर्णय नाही ; अफवा पसरवु नये : निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी
दि .२० : नांदेड , राज्यात व नांदेड शहरात कोरोनामुळे मृत्यू आणि रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात येणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. सोशल मीडियावरील विविध ग्रुपवर त्या पद्धतीचे ‘मेसेज’ फिरत असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्येही लॉकडाऊन पुन्हा लागू होते की काय, अशी चर्चा सुरू झाली. . यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट शब्दांत लॉकडाऊन पुन्हा लागू होण्यासंबंधी कोणतीची चर्चा प्रशासकीय पातळीवर झाली नसून, शासनाकडूनही तशा सूचना नसल्याचे सांगितले. , अफवा पसरवु नये व कोव्हीडचे नियम पाळावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे . प्राप्त माहिती नुसार नांदेड शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन ची चर्चा सकाळपासून सुरू होती ती आता थांबली आहे . जनतेने कोरोनाचे नियम पाळत , जबाबदारी घेत व सोशल डिस्टन्स पाळून कार्य केले तर नक्किच लॉकडाऊन ची गरज भासणार नाही . असेही उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले आहे-
जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तथापि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे असून ज्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर अथवा ट्विटर, इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

Comments
Post a Comment