रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट ! अकादमी

 


मुंबई , दि . १ फेब्रुवारी २०२१ :- क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक असून , यासंदर्भात कुलकर्णी यांनी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना . अशोक चव्हाण यांची भेट घेऊन विचारविनिमय केला . सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व ' क्रिककिंगडम'चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर ना . चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली . नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून , ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल , अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली . कुलकर्णी यांनी यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली . कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून ना . अशोक चव्हाण यांना एक टी - शर्ट भेट दिले . या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे .

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान