मुखेडात शिवजन्मोत्सव निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम

 मुखेडात शिवजन्मोत्सव निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम


व्याख्यान, रक्तदान शिबीर, कवीसंमेलनाचे आयोजन


मुखेड : प्रतिनिधी

       रयतेचे राजे, कुलवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने शासनाच्या आदेशाचे पालन करुन प्रबोधनात्मक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      शिवजन्मोत्सवा निमित्त शिवस्मारक येथे गुरुवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य डाॅ.उमाकांत राठोड, औरंगाबाद यांचे व्याख्यान होणार आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर तर उद्घाटक काँग्रेस कमीटी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पा.मंडलापुरकर यांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शिवस्मारक येथे ध्वजारोहन आ.डाॅ.तुषार राठोड यांच्या हस्ते होणार आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, तर प्रतिमापुजन माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच ११ वाजता शिवस्मारक परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास पाटील सुमठाणकर तर उद्घाटक माजी आ.सुभाषराव साबणे यांची उपस्थिती राहणार आहे. दि.१९ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता रक्तदान शिबीराचे उद्घाटन जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा भूषण डाॅ.दिलीपराव पुंडे राहणार आहेत. दुपारी ४ वाजता पालखी मिरवणूक यावेळी प्रतिमापुजन डाॅ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शेषेराव चव्हाण ते भंते रेवत बोधी, हाफिज माजीद साब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. शनिवार दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील प्रसिध्द साहित्यिक, कवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलन होणार आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर, उद्घाटक माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव पा.बेटमोगरेकर यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजिय सर्व सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमास शासनाच्या नियमांचे पालन करुन सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान