हिमायतनगर नगर पंचायत प्रशासन कडून मतदारांचे सर्वे करण्यास सुरवात,
हिमायतनगर नगर पंचायत प्रशासन कडून मतदारांचे सर्वे करण्यास झाली सुरवात,
हिमायतनगर प्रतिनिधि :- अजिम हिंदुस्तानी
हिमायतनगर शहरात नगर पंचायत निवडणूक होणार असून, संपूर्ण हिमायतनगर शहराची मतदारांची मूळ प्रारूप यादी नगर पंचायत प्रशासनाकडून तयार करण्यात आली होती.
सदरील मूळ प्रारूप मतदार याद्या मध्ये प्रत्येक वार्डात इतर वार्डातील मतदारांची नावे सामील झाली होती.
तर काही वार्डात बाहेरचे गावातील नातेवाईकांची नावे आप आपल्या वार्डात आणल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला असल्याने सदर मतदार मूळ प्रारूप यादी ची चुका दुरुस्त व्हाव्या व मतदारांचे घर वार्डात आहे किंवा नाही, याचे सर्वे करण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने वेग वेगळ्या वार्डात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या स्थानिक घराची पाहणी करून मतदार याद्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीत आहे. व तसेच प्रत्येक वार्डात जाऊन नगर पंचायत प्रशासन पंचीनामा करीत आहे.
व तसेच हिमायतनगर शहरात प्रत्येक वार्डात ड्रोन कॅमेरेचा नकाशा प्रमाणे सर्वे करण्यास सुरुवात झाली आहे.
ड्रोन केमेरेच्या सर्वे नकाशा प्रमाणे मतदारांचे नावे कोणत्या वार्डात येत आहे, त्याची पाहणी नगर पंचायत प्रशासन करीत आहे.
तरी हिमायतनगर शहरातील सर्व सुजान नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनास मतदारांच्या चौकशीसाठी आपल्या वार्डात आल्यास सहकार्य करण्याची गरज आहे.

Comments
Post a Comment