शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा

 शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा


मुखेड, प्रतिनिधि :- 

             येथील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मनोहर तोटरे, उपप्राचार्य प्रा. संजीव डोईबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप केरुरे यांची विशेष उपस्थिती होती. यावर्षी कोविडच्या परिस्थितीमुळे जाहिर कार्यक्रमाला फाटा देऊन छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मराठी विभागाच्या वतीने "शब्दशाहिरी" या भित्तीपत्रकाचा "कुसुमाग्रज विशेषांक" प्रा. डोईबळे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

        याप्रसंगी प्रा. संजीव डोईबळे म्हणाले की, मात्तभाषेतून व्यवहार साधणे व आपल्या मनातील भावना प्रगट करणे ही काळाची गरज आहे. आपल्या मराठी भाषाचा डंका प्राचीन काळापासून ते आजपर्यंत चालू आहे. मराठी विभाग प्रमुख डॉ. राम धारासूरकर याप्रसंगी म्हणाले की, जगातील मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्या ३० महत्त्वाच्या भाषेत आपल्या मराठी भाषेचा समावेश होतो. मराठी भाषेची परंपरा आणि परिस्थिती यावरही त्यांनी विवेचन केले.

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागातील प्रा. डाॅ. केशव पाटील यांनी केले तर आभार प्रा. बसवेश्वर स्वामी यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. अशोक अंधारे, डॉ. स्वानंद मुखेडकर, प्रा. नामदेव नागरगोजे, प्रा. मोईन काझी, डाॅ. महावीर उदगीरकर, प्रा. सुदाम फड, प्रा. माधव मंदेवाड, प्रा. गुरुनाथ बेळीकर आदी उपस्थित होते.

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभाग प्रमुख डाॅ. राम धारासूरकर, डाॅ. केशव पाटील, प्रा. बसवेश्वर स्वामी तसेच विद्यार्थी संपादक कु. अंजली ठाकूर, कु.वैष्णवी देवकत्ते, कु. शिवानी भिकनुरे, सचिन गायकवाड आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान