युवा पीढ़ीने लेखकांना जपले पाहिजे: नजीर शेख


युवा पीढ़ीने लेखकांना जपले पाहिजे: नजीर शेख



 सरफराज अहमद गेल्या काही वर्षापासून आपल्या लिखाणातून व आपल्या भाषणातून महाराष्ट्रात सुपरिचित आहेत.मराठी माध्यमातून व्यक्त होणारे मुस्लिम लेखक त्यातल्यात्यात प्रभावी वक्ते व लेखक दुर्मिळच आहेत. माझ्यातरी परिचयाचे हे एकच आहेत. मुस्लिम समाजातील आज घडीला मराठी भाषेत प्रभावीपणे लिहिणारे बोलणारे लेखक व वक्ते असतील पण मला ते मला ज्ञात नाहीत त्यामुळे जे असतील त्यांची नावे निदर्शनास आणून द्यावी. प्रभावी लेखकात माझा समावेश मी करीत नाही हेही लक्षात घ्यावे.

 ही पोस्ट करण्याचा उद्देश हा आहे की समाजातील युवकांना लेखनाच्या माध्यमातून तर्कनिष्ठ व विवेकी बनवणे राष्ट्रीय एकात्मता जोपासणे देशातील जातीय धर्मांध विचारांच्या विरोधात लिखाण करून येथील जनतेला धर्मनिरपेक्षतेची शिकवण देऊन एक आदर्श समाजाची  निर्मिती करणे ही ध्येय घेवून जे लिहीत आहेत त्यांच्या पाठीशी समाजाने खंभीर रित्या उभे रहावे. ही काळाची गरज झाली आहे तरी प्रभावी  लेखक तयार झाले पाहिजे जे आज होत नाही आहे. जे आहेत त्यांच्या मागे समाज असतो का?   आज घडीला किती जण  आज सरांच्या मागे उभे आहेत व  विचारांची आहे.  सरांचे माझे वैचारिक मतभेद असतील  कुरुंदकरांच्या त्यांच्या लिखाणाचा मी प्रतिवाद करण्याच्या विचारात आहे. भविष्यात लिहीन सध्या तरी नाही.

  परंतु हा व्यक्ती महाराष्ट्रभर समाजप्रबोधन करीत भटकत  आहे प्रतिगामी विचारांच्या  लिखांनाचा त्यांच्या विचारधारेचा ,त्या लोकांचा प्रतिवाद करीत आहे. समाज विवेकी व्हावा यांच्यातून लेखक निर्माण व्हावे तर्कनिष्ठ व विज्ञाननिष्ठ व चिकित्सक बुद्धी आत्मसात करून समाजाच्या उन्नतीला हातभार लावावे व एक आदर्श समाज निर्माण करावा  मनषेतून हा लेख लिहितोय व्याख्याने देतोय हे कुठेतरी मला भावले दखल घ्यावी वाटते परंतु समाजातील लोक किती दखल घेतात. आजचे आमचे सुशिक्षित लोक या कार्याला हातभार का लावत नाहीत??

    आपले हित संबंध पणाला लावून , आर्थिक मोह टाळून विवेकी व तर्कनिष्ठ पिढी घडवण्यासाठी हा लिहतोय बोलतोय  याची दखल मला घ्यावीशी वाटते पण  समाज किती दखल घेतोय??हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आज रंजक कथा कादंबऱ्या लिहिण्याची वेळ नसून वैचारिक लिखाणाची गरज आहे. आपल्यामधील काही वैचारिक लिखाणासाठी पुढे येतात त्यांच्या मागे किती जण उभे   राहतात किती जण पुढाकार घेऊन अशा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येतात.? मी ही   रंजक कथा कादंबऱ्या लिहू शकतो व अनेक जण लिहू शकतात परंतु हे टाळले पाहिजे कारण आज खरी विचारांची लढाई आहे व या विचारांच्या लढाईमध्ये ही लढाई जिंकायची असेल तर वैचारिक प्रग्लभता का निर्माण झाली पाहिजे व ही वैचारिक प्रगल्भता योग्य व्यासंगातून व अभ्यासातून व चिंतन मनातून येऊ शकते परंतु असले काही न होता चिंतन-मनन तर सोडा साधे वाचनही आज समाजातील युवक व जाणकार मंडळी करीत नाहीत.आज लेखन जगतात भितीदायक वातावरण आहे भारतामध्ये  अनेक लेखकांच्या लेखण्या थंडावलेले आहेत आणि लेखक भीतीपोटी काही लिहीत नाहीत परंतु अशा काळामध्ये जे लेखक लिहिण्यासाठी पुढे येतात अशा लेखकांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे व त्यांच्या  लेखनाची भाषणांची दाद आपण दिली पाहिजे परंतु ही दाद तर सोडा साधा कोणी विचार ही करीत नाही.आज खरी गरज समाजाला वैचारिक खुराक देण्याची आहे  हि खुराक सरफराज अहमद सारखे लोक देण्याचे काम करीत आहे. त्यांचे विचार आत्मसात करून व हे विचार पुढच्या पिढीसाठी संग्रहित करून याची जोपासना केली पाहिजे.

  अहो आमच्याकडे विचारवंत तत्त्वचिंतक बोटावर मोजण्याइतकी तरी पण आम्ही त्यांची दखल घेत नाही सरफराज यांचे  युट्युब काही विडीयो आहेत तीन वर्षापूर्वी अपलोड केलेले. खंताची बाब म्हणजे   चारशेच्या वर  लोकांनी पाहिलेले नाही यावरून समाजाची स्थिती लक्षात येईल. आजच्या या युगात पुस्तके वाचण्यास मिळत नसेल परंतु मोबाईल युवा पिढी इतका वेळ घालवत आहे तरीपण हे वैचारिक व्हिडीओ किंवा आमच्या लेखकांचे लेख वाचण्यात वेळ मिळत नसेल का? हे खूप हास्यास्पद आहे.      समाजातील लोक समाज उन्नती ला हातभारच लावत नाही तर या समाजाची उन्नती होणार तरी कशी? हि खरी शोकांतिका आहे .आम्हाला इतर कार्यक्रम करण्यात खर्च करावा वाटतो परंतु एकांद्या वैचारिक मेजवानी साठी खर्च करावा वाटत नाही, एखादी व्याख्यानमाला ठेवावी वाटत नाही,समाजातील पिढ्यांना वैचारिक खुराक देण्यासाठी खर्च करावा वाटत नाही, वाचणालये निर्माण करावी वापत नाही. परिसंवाद चर्चासत्रे घडवून आणावीशी वाटत नाही.

  बीड मधील आमचे मित्र सुफियान यांनी पुढाकार घेवून वाचणालय सुरू केले. हे असले अनुकरण करूण तरूणांनी पुढे का येवू नये. सुफीयान यांचे करावे तेवढे कौतुक कमी पण इतर बांधव यातुन बोध घेतील का?  समजातील लोक वैचारिक का नाही व विचार का करत नाहीत?हा  माझ्या चिंतनाचा विषय झाला आहे.मी या समाजाच्या    भविष्याबाबत चिंतित आहे ,कारण यांना व्यक्त होता येत नाही व व्यक्त न होता तुम्ही आपल्या समस्या सांगू शकत नाही. व्यक्त न होता  आपली मते,विचार स्पष्ट करू शकता येत नाही त्यामुळे आम्ही व्यक्त होण्यास शिकले पाहिजे. हे  व्यक्त होणे शिकवण्याचे व बोलके करण्याचे काम  सरफराज अहमद  यांच्यासारखे अनेक लोक आज घडीला करतात  ज्याची खरी गरज आहे. ते ऐकून घेणे व ते ऐकलेले आत्मसात करणे त्याच्यावर विचार करणे ही सामाजाची जबाबदारी आहे. परंतु यावर  विचार तर कोणी करीत नाही  समाजातील युवक चित्रपटाचे भाष्यकार बणतान नट नटीच्या सौंदर्य वर गप्पा गोष्टी करतात फालतुचे शौक करतात यासाठी वेल आहे परंतु वास्तविकता जाणून घेण्याची इच्छा नसल्यांने लेखन श्रेत्रात लेखक तर सोडा वाचक ही नाही ही शोकांतिका आहे जे सत्य आहे परिवर्तन अपरिहार्य आहे परंतु ज्यांना रसच नाही त्यांच्या पिठ्या अरसीकच असतील. उर्दु भाषेत आमच्या विचारवंतानी जो साहित्य भंडार रचला आहे तीकडे लक्ष वेधून घेण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो परंतु लक्ष  दिले पाहिजे ना.  मौलाना आजाद वयाच्या १८ वर्षी" कुरान शरीफ" भाष्य लिहतो तेपण व्यक्तिच होते ना घ्याना आदर्श त्याच्या सारखे बना ना. आम्हाला ही बुद्धि आहे आम्ही ही विवेकी व तर्कनिष्ठ पिढी घडवू शकतो  याचा विचार का होवू नये. उर्दु व अरबी भाषा मध्ये खुप तत्वज्ञानी लिखान केले निदान ते तरी वाचा  .  

   आज घडीला सरफराज सारख्या दुर्मिळ व्यक्तींना जपले पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. आज भूमिके स्पष्टता आहे परंतु परिस्थिती स्थिर राहील याची शाश्वती नाही  जर काळाच्या ओघात यांच्या भूमिकेत बदल झाला किंवा पाठबल अभावी  भूमिकेत बदल करावा लागला तर यासाठी  समाज जबाबदार राहणार यामध्ये लेखकाला दोष देता येणार नाही. आमची समाजाला एकच कळकळीची विनंती राहील की आपल्या परीने जरी आर्थिक मदत नाही करता आली तरी  तेजे विचार सांगतात ते आत्मसात करणे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार पोहोचवणे सर्वांची जबाबदारी आहे.एकंदरीत युवा पिढी सुजणा आहे परंतु वैचारिक नाही पिढीला लेखणी महत्वाची  वाटत नाही, लेखणी धरली तर काय लिहावे व लिहिण्याचे बळ येईल तरी कुठून. शब्दभांडार व योग्य व्यसन   एक उत्कृष्ट लेखकाला  लिहिण्यासाठी काही सुचते. मुळात आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार त्यामुळे कमी वाचन असलेले वैचारिकी शून्य असलेले आमचे युवक लिहीतील तरी काय. 

आज जे   लिहीत आहेत व जे सातत्याने मत मांडीत आहेत त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन अंमल युवा पिढीने करावा असे मला वाटते.वैचारिक प्रगल्भता निर्माण होण्यासाठी सातत्याने व चिंतनशील मनाने या गोष्टीचा विचार करावा की आज घडीला आरोप-प्रत्यारोप व प्रतिगामी विचारांचे खंडन करण्यासाठी लेखकांची गरज आहे व आपल्याकडे लेखकांचा तोटा आहे. आपल्यात लेखंनाची क्षमता नसली तरी जे   सातत्याने बोलत आहेत लीहीत आहैत त्यांच्या समर्थनात तरी  आपण पुढे यावे. लिखान वाढत चालले तरी मित्रांनो मला  या गोष्टीचे अत्यंत अत्यंत वाईट वाटते की आमच्यात थोडे का असेना पण लेखक आहेत जे वैचारिक क्रांती घडवून आणू शकतात  परंतु गरज आहे आपल्या सर्वांच्या पाठबळाची. एखांदा लेखक समाजप्रबोधनाच्या ध्येयाने पेटून उठतो व त्याचे स्वा:ता कडे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. निर्भिड लिखाणातून  अनेकांच्या रोषाला सामोरे जावे अश्या लेखकांना मोठी किम्मत मोजावी लागते हे लक्षात घेतले पाहिजे.लेखनजगतात शब्दांचा खेळ चालतो या शब्दांच्या खेळतात असलेले आमचे लेखक आपली कसब दाखवून समाजालाही तारतात एक प्रकारे हे विचारवंत लेखक आपल्या समाजाला तारण्याचे त्यांचे काम करतात याची दखल समाजाने घ्यावी  सांस्कृतिक रक्षणासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय असते परंतु दखल कोण घेतोय.मी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे की पाठिंबा शिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणवून लेखक समर्थनात उभे राहावे.

--------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------

©शेख नजीर.

      नांदेड़

9561991736

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान