डोरनाळीत शिवजयंती निमित्त व्याख्यान,महाप्रसादचा कार्यक्रम संपन्न

 डोरनाळीत शिवजयंती निमित्त व्याख्यान,महाप्रसादचा कार्यक्रम संपन्न



मुखेड / प्रतिनिधी  

 मुखेड तालुक्यातील डोरनाळी येथे शिवजन्मोत्सवा निमित्त दि.२५ फेब्रुवारी रोजी व्याख्यानाचे कार्यक्रम व दि.२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळच्या दरम्यान महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन धव्जारोहन करण्यात आले धव्जारोहनानंतर महाप्रसादाचे कार्यक्रम संपन्न झाले 

          रयतेचे राजे कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्त तालुक्यातील डोरनाळी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात दि.२५ फेब्रुवारी रोजी संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष तथा शिवव्याख्याते शाम पाटील कुशावाडीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलबंरकर, संभाजी बिग्रेडचे देगलुर तालुकाध्यक्ष किरण पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता या सर्वांनी संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,डाॅ बाबासाहेब आंबेडकर याच्यांसह सर्व महापुरूषांचे अनमोल कार्य व त्यांच्या विचारावर प्रकाश टाकला आणी उपस्थितांना समजेल असे सविस्तर विचारांची मांडणी करत आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली व्याख्यानाप्रसंगी चिमुकल्या मुलींची व अनेकांची मनोगते झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड लोकसभा उपाध्यक्ष दिलीप पाटील सुगावे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील कुशावाडीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर,जेजेराव पाटील देगलुर, किरण पाटील देगलूर, माधव पाटील शिंदे, संभाजी ब्रिगेड मुखेड तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्रसंचलन योगेश पाटील शिंदे यांनी केले तर प्रस्तावीक प्रकाश पाटील शिंदे यांनी मांडले उपस्थितांचे आभार महेताब शेख यांनी मानले व्याख्यानंतर दि.२६ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन धव्जारोहन करण्यात आले धव्जारोहनाचे कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा  अस्वाद गावकऱ्यांनी घेतला कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व्यंकट शिंदे,उपाध्यक्ष अविनाश देवकते, सचिव नागनाथ गोजेगावे, कार्याध्यक्ष जयराम शेवाळे,कोषाध्यक्ष बजरंग शिंदे यांच्यासह गावातील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक, महिला, युवक व चिमुकल्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान