मुखेडच्या विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार ; कर आकारणीच्या नावाखाली ग्राहकांची लुट,अव्वाच्या सव्वा बिले देणाऱ्या विद्युत कंपनीच्या नावाने बोंबाबोंब

मुखेडच्या विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार ; कर आकारणीच्या नावाखाली ग्राहकांची लुट


 अव्वाच्या सव्वा बिले देणाऱ्या विद्युत कंपनीच्या नावाने बोंबाबोंब


मुखेड :  विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्याने वीजबिल वसुलीच्या नावावर अनेकांची मुस्कट दाबी करत असून वीज बिलाच्या नावाखाली लाखो रुपयाची वसुली करून अर्धे पैसे हडप करत असल्याने मुखेड तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक व सामान्य जनता त्रस्त झाली असून अव्वाच्या सव्वा बिले देणाऱ्या विद्युत कंपनीच्या नावावर मुखेड तालुक्यात बोंबाबोंब सुरु आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुखेड वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्याने वीज बिल वसुलीच्या नावावर ग्राहकाला अरेरावी करून विद्युत पुरवठा खंडीत करतो म्हणून दमदाटी करत असल्याचा प्रकार मुखेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे व्यावसायिक व सामान्य जनता त्रस्त असताना विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी , कर्मचाऱ्याने अव्वाच्या सव्वा बोगस बनावट रीडिंग टाकून ग्राहकांना जास्तीचे बिले दिली आहे. एका ग्राहकाचे विद्युत बिल 90 रुपये एवढे असेल तर त्याच्या लाईट बिलावर विविध कर आकारणीची रक्कम 655 रुपये एवढी येत आहे. हि सर्व रक्कम मिळून 745 रुपये एवढे बिल ग्राहकाला येत असल्यामुळे ग्राहक गांगारून जात आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल माफ करू असे जाहीर केलेलं होते मात्र थोड्या दिवसातच शासनाच्या तिजोरीवर बोजा येत असल्याचे सांगत उर्जामंत्र्याने कलटी मारली त्यामुळे ग्राहकांत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

वितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याने धनदांडगे व बड्या लोकांचे विद्युत पुरवठा खंडित केला नाही पण सर्वसामान्य झोपडपट्टीत राहणाऱ्या ग्राहकाची वीज खंडित केली. सामान्यांसाठी एक न्याय बड्या लोकांसाठी वेगळा न्याय या दुटप्पी भूमिकेमुळे विद्युत वितरण कर्मचाऱ्यात ठिकठीकाणी खडाजंगी होताना दिसत आहे. बड्या लोकांचे लाखो रुपयाचे बिल असूनही त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला जात नाही पण नियमित बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो हे मात्र दुर्दैवी आहे.

Comments

  1. होय खर आहे हे माझ्या बद्दल ही असाच प्रकार घडलेला आहे.5 वेळा तक्रार नोंदवली तरिही दखल घेतली जात नाही याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाचही दुर्लक्ष आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान